जळगाव येथे अन्नदान करुन जागतिक मानवाधिकार दिवस साजरा.

0
11

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – दि.१० डिसेंबर रोजी जागतिक मानवाधिकार दिवस साजरा करण्यात येतो. त्या निमित्ताने उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुधीर सुकलाल पाटील यांनी जळगाव शहरातील गोरगरीब गरजूंना रेल्वे स्थानक ,तसेच चौकाचौकात ठिकठिकाणी भाजी पोळी ,वरण भात, वडापाव ,पाणी बाटली असे वाटप करुन खऱ्या अर्थाने मानवाधिकार दिवस साजरा केला विशेष म्हणजे सुधीर पाटील यांनी स्वयंप्रेरणेने हे अन्नदानाचे कार्य केले. राष्ट्रीय मानवाधिकार संघटना भारत संस्थापक अध्यक्ष सांगेश कुमार भाटी यांनी मानवाधिकार संघटनेच्या दिलेल्या सूचनेनुसार या दिवसाचे औचित्य साधून भारतभर हा दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात यावा अशा सुचना देण्यात आल्या होत्या. समाजातील गरीब लोकांना मदत करणे.

मानवाधिकार रक्षण आणि सन्मान करणे तसेच सोशल मीडिया प्रिंट मिडीया व्दारे मानवाधिकार बाबत जागरुकता आणि सकारात्मक समाज निर्माण करण्या विषयी योगदान देणे लहान मुले व युवा पिढी यांना मानवाधिकार विषयावर माहिती देणे या विषयी संकल्प दिवस साजरा करण्याच्या सुचना वरिष्ठांनी केल्या होत्या.

यावेळी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुधीर पाटील यांनी नंदूदादा बडगुजर ,अशोक मधवानी ,मनोहर बडगुजर, ताहेर झवेरी, ऋषीकेश बावस्कर ,सुरेश टेलर ,दिगंबर पाटील या कार्यकर्त्यांच्या मदतीने साजरा केला.

Spread the love