चरा मंगल कार्यालयाच्या उद्घाटन निमित्त कडगाव येथे श्रीमद् भागवत सप्ताहाचे आयोजन

0
22

प्रतिनिधी -:  जितेंद्र काटे

भुसावळ -: जळगाव खुर्द रोडवर कडगाव येथे श्री चरा मंगल कार्यालयाच्या उद्घाटन व श्रीदत्तजयंती निमित्ताने श्री मनुदेवी मंदिर ट्रस्ट निगडी पुणे व श्री दत्त मंदिर ट्रस्ट कडगाव यांचे संयुक्त विद्यमाने श्रीमद भागवत सप्ताह दि.१२ ते १९ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. तरी परिसरातील भाविकांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन अध्यक्ष दिलीप पाटील,सचिन पाटील , पुंडलिक पाटील , सौ शैलजा पाटील , सौ शीतल जैन, सौ.दिव्या पाटील आदी मान्यवरांनी केले आहे .

कथाप्रवक्ते ह.भ.प.श्री दिनकर महाराज कडगावकर, मृदुंगाचार्य ह.भ.प.श्री विलास नाना साळुंखे.हर्मोनीयम वादक श्री कृष्णा महाराज गोळेगावंकर .गायनाचार्य हभप निवृत्ती महाराज बेंद्रे, हभप दिलीप गोटू महाराज, पहारेकरी हभप खुशाल महाजन न्हावी, हभप उत्तम पुंजू बोदडे मन्यारखेडे. कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे पहाटे ५ ते ६ काकडा भजन, सकाळी ६ ते ७ विष्णुसहस्रनाम , दुपारी १२ ते ४ श्रीमद भागवत कथावाचन. सायंकाळी ४ ते ५ हरिपाठ.
दि .१४ रोजी जळगाव जिल्ह्यातील सर्व निवडून आलेल्या आमदार व सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार श्री ज्ञानेशचंद्र गौंड संपर्क प्रमुख [बूज क्षेत्र ] उत्तर प्रदेश याचे हस्ते करण्यात येणार आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे .तसेच काल्याचे कीर्तन १९ रोजी होईल, भारुड, दिंडी सोहळा लगेचच महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आयोजकानी केले आहे.

Spread the love