जळगाव -: येथील कांचन नगरातील श्री. गुरुदत्त बहु. संस्था, जळगावमार्फत जागृत गुरुदत्त मंदिरात मोठ्या आनंदीमय उत्साहात दत्त जयंती सादर करण्यात आली दि. ०८/१२/२०२४ ते १५/१२/२०२४ पर्यंत श्रीमद भागवत कथा व गुरुचरित्र कथा, किर्तणी सप्ताहाचे आयोजित करण्यात आले होते दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी ५ वा काकड आरती, सकाळी ६:०० वा. दत्त मूर्तीचे अभिषेक मंदिराचे विश्वस्त राजेंद्र कोळी व सौ. आक्काबाई कोळी यांनी केले, सकाळी १० ते १२ वा. ह. भ. प. शालिकग्राम महाराज, जळगावकर यांचे काल्याचे किर्तन झाले, दुपारी १२:०० वा. गुरुदत्त सेवा पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
सदरहू पुरस्कार हा निलेश बोरा, डॉ. गोकुळ बिहाडे, उमेश सोनवणे, शशिकांत भालेराव, लक्ष्मण पाटील यांना सामाजिक व आरोग्य विषयी कार्य केल्या बद्दल देण्यात आले दुपारी १२:३० वा. महाआरती करण्यात आली. महाआरती प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आमदार सुरेश भोळे, कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष श्री. बाळासाहेब प्रदिप पवार, नगरसेवक कै. कैलास सोनवणे, किशोर बाविस्कर, सौ. कांचनताई सोनवणे, सौ. गायत्रीताई शिंदे इ. गट विकास अधिकारी सुभाष जाधव, सामाजिक कार्यकर्ते भरत कोळी, रोहन सोनवणे, मुरलीधर कोळी, रतिलाल सपकाळे, पितांबर शिरसाठ, जीवन कोळी, मुरलीधर सोनार, चंद्रकांत पाटील, मनोज सोनवणे, योगेश बाविस्कर, डॉ. परिमित बाविस्कर, डॉ. विजय पवार, कामगार कल्याण मंडळाचे निरीक्षक भानुदास जोशी इत्यादी उपस्थित होते. दुपारी १२:३० ते ४:०० वा. पर्यंत महाप्रसाद (भंडारा) झाला. संध्याकाळी ६:०० वा. मंदिराचे विश्वस्त ज्ञानेश्वर कोळी व सौ. सुरेखा कोळी यांच्या हस्ते आरती झाली संध्या ६ ते ७ हरिपाठ झाला. रात्री ९ ते ११:३० दात जन्मावर ह. भ. प. प्रल्हाद महाराज कलमसरेकर यांचे किर्तन झाले. रात्री. १२:०० वा. आरती व आभार प्रदर्शन मंदिराचे विश्वस्त राजेंद्र कोळी यांनी करून कार्यक्रमाची सांगता झाली. मंदिराचे दर्शन भाविकानी मोठ्या प्रमाणात घेतले.
कार्यक्रम यशस्वी साठी दिलीप सपकाळे, नामदेव पाटील, युवराज बाविस्कर, राजू ठाकूर, संतोष पाटील, गोपीचंद साळुंके, उमेश सोनवणे, सुभाष वास्कर, सोन्या सोनार, बापू ठाकरे, दिनेश सोनवणे, नरेंद्र सपकाळे, अशोक माळी, किरण बाविस्कर, रविंद्र सोनवणे, रितेश कोळी, गौरव कोळी, तेजस कोळी, तसेच गुरुदत्त मंदिराचे सेवक व परिसरातील नागरिक उपस्थित होते.