विषारी पदार्थ सेवन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

0
47

जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील घटना

जळगाव – : तालुक्यातील ममुराबाद येथील तरुणाने दिनांक 2 जानेवारी रोजी विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या तरुणावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरु असतांना आज दिनांक3 रोजी दुपारी दिड वाजेच्या सुमारास या तरुणाची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील सचिन अशोक सावळे (वय 35 ) या तरुणाने विषारी पदार्थ सेवन केले होते. त्याला जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दाखल केले होते. याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरु असतांना दि. 3 रोजी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत्युचे कारण अद्याप समजु शकले नाही.
पुढील तपास तालुका पोलीस स्टेशनचे विलास शिंदे करित आहे.

Spread the love