नशा आणि अपप्रवृत्ती पासून दूर रहा — पोनि.महेश गायकवाड

0
39

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – येथे दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी शहीद राकेश शिंदे औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भुसावळ येथे राष्ट्रीय युवा दिवस साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड तालुका भुसावळ तालुका पोलीस स्टेशन, शहीद राकेश शिंदे यांचे मातोश्री तसेच परिवार, संस्थेचे प्राचार्य महेंद्र राजपूत, पत्रकार दीपक चांदवानी शिक्षक वृद व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उपस्थित युवकांना पो नि महेश गायकवाड यांनी

1. शिस्त आणि वेळेचे महत्त्व

2. नशा आणि अपप्रवृत्तींपासून दूर रहा

3. तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करा

4.समाजासाठी योगदान द्या

5. स्वास्थ्य आणि फिटनेस

तरुणांना संदेश

स्वामी विवेकानंद म्हणाले होते, “उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका.” या विचारांवर चालत, तुमच्या स्वप्नांना ध्येयात रूपांतरित करा असे मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्राचार्य महेंद्र राजपूत यांनी केले, तसेच मान्यवरांनी युवकांना मार्गदर्शन केले. संस्थेच्या विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात भाग घेऊन पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

Spread the love