पालकमंत्री पद वाटण्याआधीच गुलाबराव पाटलांकडून मोठी घोषणा.

0
63

जळगाव -: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील विस्तार झाला असून खातेवाटप देखील पूर्ण झाले आहे. मात्र अद्यापही पालकमंत्री पदाचा वाटप करण्यात आलेले नाही. सध्या आपापल्या जिल्ह्यांचे पालकमंत्री पद मिळावे, यासाठी विविध मंत्र्यांकडून लॉंबिंग सुरू झाली आहे.

त्यातच आता आमदार आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वत: स्वत: ला पालकमंत्री म्हटले आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. नुकत्याच एका भाषणात त्यांनी स्वत: ला जळगाव जिल्ह्याचा पालकमंत्री असल्याचे म्हटले आहे.

सरकार काठावर येईल असं सर्वांना वाटलं होतं. मात्र बंपर बहुमत मिळालं. २३७ जागा निवडून आल्या. लाडक्या बहिणींना असा करंट मारला की त्यांचे सावत्र भाऊ डायरेक्ट ठार झाले. कोणत्याही नेत्याचा राजकारण हे कार्यकर्त्यांच्या भरोशावर होतं. ज्या नेत्याकडे चांगले कार्यकर्ते आहेत. तो नेता श्रीमंत असतो असं म्हणतात. मी आतापर्यंत मंत्रीपद राखलं नाही. पण माझ्या कार्यकर्त्यांकडे जर वाकड्या नजरेने बघितलं तर मग पालकमंत्री काय असतं ते दाखवून देणार. असा इशारा गुलाबराव पाटलांनी दिला आहे. जळगाव तालुक्यातील वावदडा गावातील विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाला ते उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, २२७ जागा आल्या तर मात्र मंत्रिपद मिळेल का नाही मिळेल, याची काळजी होती. टिव्हीवर फोटो तरी सुद्धा पण मिळेल का, हे माहित नव्हतं. पण मिळालं. आता पुढच्या काळामध्ये निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्ये आपल्याला बेसावध राहून चालणार नाही. तुम्ही फक्त तिकीटांसाठी लढाई करू नका. भाजप शिवसेना एकत्र लढले तर समोरच्याची एक पण जागा निवडून येणार नाही. कार्यकर्त्यांना मी हात जोडून सांगणार आहे की तुम्ही असे वागा हे लोकांना वाटलं पाहिजे की हो हे गुलाबराव पाटलांचे कार्यकर्ते आहेत. असेही गुलाबराव पाटील म्हणाले.

Spread the love