वराडसिम – सुनसगाव गणात भाजपा सदस्य नोंदणीला प्रतिसाद.

0
50

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील वराडसिम – सुनसगाव पंचायत समितीच्या गणात भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत असून पंचायत समितीच्या सुनसगाव,बेलव्हाळ ,वराडसिम ,गोजोरा,गोंभी,वांजोळा,चोरवड ,खेडी,कन्हाळे बु व खुर्द, मिरगव्हाण या गावात जाऊन भाजपा जिल्हा सचिव भालचंद्र पाटील व गणातील गावातील सर्व भाजपा शाखा अध्यक्ष व बुथ तसेच शक्ती केंद्रप्रमुख तसेच भाजपाचे ग्रामपंचायत व विविध कार्यकारी सोसायटीचे सर्व पदाधिकारी जबाबदारी पार पाडताना दिसत आहेत.राज्याचे वस्रोद्योग मंत्री ना.संजयभाऊ सावकारे व पक्षश्रेष्ठींच्या आदेशाने भाजपा सदस्य नोंदणी सुरु असल्याचे भालचंद्र पाटील यांनी सांगीतले. यावेळी सुनसगाव ग्रामपंचायत उपसरपंच एकनाथ सपकाळे, सदस्य चंद्रकांत पाटील, राहुल नारखेडे, तसेच सुरेश निकम, अंकुश पाटील, हर्षल पाटील, जितू पाटील, लहू पाटील, सुरेश नेहेते, भानुदास पाटील, सौ.डिंपल पंकज पाटील व नागरीक उपस्थित होते.

Spread the love