लाचखोर मुख्याध्यापक एसीबीची जाळ्यात कारवाई करत मुख्याध्यापक अटकेत

0
62

जळगाव – : जळगाव एसीबीच्या रडारवर नेहमीच शासकीय कार्यालय व लाच घेणारे अधिकारी असतात मात्र आज झालेल्या कारवाईमध्ये चक्क एका मुख्याध्यापकाने शाळेतील शिक्षकाकडून एक हजाराची लाच घेताना जळगाव एसीबीने बेड्या ठोकल्या आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथे असलेल्या प्राथमिक शाळेची इन्स्पेक्शन सुरू आहे. दरम्यान शाळेचे इन्फेक्शन करत असताना शिक्षण विस्तार अधिकारी यांनी चांगला शेरा लिहावा म्हणून १० हजार रुपये मागितले आहेत, असे सांगून शाळेचे मुख्याध्यापक बळीराम सुभाष सोनवणे वय-५५, रा. एरंडोल यांनी शाळेतील प्रत्येक शिक्षकाकडून १ हजार रुपये असे एकूण १० हजार रुपयाची मागणी केली. दरम्यान यातील तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाला या संदर्भात तक्रार केली. सोमवारी लाच लुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचून कारवाई करत शिक्षण विस्तार अधिकारी यांना पैसे देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून १ हजार रुपयांची लाचेची मागणी केली. दरम्यान तक्रारदार यांनी १ हजार रुपये हे देत असताना लाच लुचपत पथकाने कारवाई करत मुख्याध्यापक बळीराम सोनवणे यांना रंगेहात पकडले. तसेच शिक्षण विस्तार अधिकारी यांची फोनद्वारे पडताळणी केली असता त्यांनी २ हजार रुपये मिळाल्याबाबत विरोध दर्शवला नाही आणि नंतर कॉल करतो असे सांगून फोन ठेवला. दरम्यान या संदर्भात एरंडोल पोलीस ठाण्यात शाळेचे मुख्याध्यापक बळीराम सुभाष सोनवणे वय-५५ रा. एरंडोल आणि एरंडोल पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी जे.डी. पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुरेश पाटील, पोलीस नाईक बाळू मराठे, पोलीस कॉन्स्टेबल राकेश दुसाने यांच्यासह पथकाने केली आहे.

Spread the love