मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे आज अंतरवाली सराटीमध्ये आरक्षणाला बसले आहेत. मराठा समाजासाठी ते आरक्षणाला बसले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, सगेसोयरे जीआर लागू करा.
शिंदे समितीला मुदतवाढ द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मनोज जरांगे म्हणाले की, सलग दोन वर्ष आम्ही झुंजतोय. गुन्हे दखल सरसकट मागे घ्यायचे असे सरकारने सांगितले होते पण अद्याप घेतले नाही. सातारा संस्थान हैदराबाद गझेट मुंबई गझेट लागू करण्यात यावे. आमच्या ८-९ मागण्या सरकारकडे दिल्या आहेत. जुन्याच मागण्या आहेत. त्या मान्य कराव्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती की त्याची अंमलबजवणी करा, असं ते म्हणाले आहेत.
मराठा समाजाचे दुःख वाटून घ्या. संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली आहे. त्यातील आरोपींना शिक्षा झाली पाहिजे. त्याची साखळी गुंडगिरीचा नायनाट करावा. मुख्यमंत्री हे मराठ्यांशी बेइमानी, गद्दारी करणार नाहीत, अशी मला खात्री आहे.