महाराष्ट्रातील १४ दिग्गजांना पद्म पुरस्कार, वाचा संपूर्ण यादी

0
52

केंद्र सरकारने शनिवारी (२५ जानेवारी) प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली. याद्वारे विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या दिग्गजांचा सन्मान करण्यात आला आहे.

या पुरस्कारांमध्ये देशातील विविध ठिकाणी आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या दिग्गजांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केलेल्या भाषणानंतर या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रपतींनी एकूण १३९ जणांची यादी जाहीर केली असून त्यामध्ये सात दिग्गजांना पद्म विभूषण, १९ दिग्गजांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला आहे. तर, ११३ जणांना पद्मश्री पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. दरम्यान, या १३९ दिग्गजांच्या यादीत महाराष्ट्रातील १४ जणांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील तीन दिग्गजांना पद्मभूषण व ११ दिग्गजांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

या पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील मारूती चित्तमपल्ली, होमिओपॅथी चिकित्सक डॉ. विलास डांगरे यांचा समावेश आहे. तसेच शैली होळकर, डॉ.नीरजा भाटला, भीमसिंह भावेश, थविल वादक पी.दत्चनमूर्ती, शेखा एजे अल सबा, एल हँगथिंग, भैरूसिंग चौहान, जगदीश जोशीला, सेनानी लिबिया लोबो सरदेसाई, हरविंदर सिंग यांना देखील पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे.

डॉ.विलास डांगरे हे होमिओपॅथिक डॉक्टर आहेत. त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय सेवा देत आहेत. त्यांनी आतापर्यंत जवळपास एक लाखांपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार केले आहेत. ते गरीब आणि सर्वसामान्य रुग्णांवर उपचार करतात. त्याचबरोबर मारुती चितमपल्ली यांनाही पद्मश्री जाहीर झाला आहे. मारुती चितमपल्ली हे ज्येष्ठ साहित्यिक आहेत. त्याचबरोबर, चैतराम पवार यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. ते वन आणि वन्यजीवाच्या संवर्धनासाठी काम करतात.

तीन दिग्गजांना पद्मभूषण पुरस्कार

पद्मभूषण

1 मनोहर जोशी मरणोत्तर

2 ⁠पंकज उधास मरणोत्तर

3 ⁠शेखर कपूर  कला

११ जणांना पद्मश्री पुरस्कार

पद्मश्री क्षेत्र

1 अच्युत पालव कला

2 अरुंधती भट्टाचार्य व्यापार आणि उद्योग

3 ⁠अशोक सराफ कला

4 अश्विनी भिडे देशपांडे कला

5 चैतराम देवचंद पवार समाजसेवा

6 जसपिंदर नरुला समाजसेवा

7 अरण्यऋषी मारुती चितमपल्ली साहित्य आणि शिक्षण

8 ⁠राजेंद्र मुजुमदार कला

9 सुभाष शर्मा कृषणी

10 वासुदेव कामत कलाा

11 ⁠डॉ. विलास डांगरे औषधी

दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा सन्मान

मागच्या वर्षी अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल होतं. या वर्षी जानेवारी महिना संपताना अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

Spread the love