गोजोरे – बेलव्हाळ शाळेची शैक्षणिक सहल रवाना.

0
52

प्रतिनिधी जितेंद्र काटे 

भुसावळ – तालुक्यातील गोजोरे व बेलव्हाळ जिल्हा परिषद मराठी शाळेची सहल रवाना झाली आहे. या सहलीत विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजीनगर प्राणी संग्रहालय , घृष्णेश्वर मंदीर , वेरुळ लेणी ,दौलताबाद किल्ला ,भद्रा मारुती असे प्रेक्षणीय स्थळ पाहायला मिळणार आहेत एकूण ६० विद्यार्थी व ५ शिक्षक सहलीसाठी गेले आहेत. या विद्यार्थ्यांना बाळू कोळी, रविंद्र पठार, निशा पाटील, भाग्यश्री लोहार, क्रांती पाटील या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभणार आहे. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भागवत कोळी, सरपंचपती व सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कोळी, धनराज वाघ व पदाधिकारी तसेच पालक उपस्थित होते.

Spread the love