प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील चोरवड येथे दिनांक 5/2/25 रोजी रात्री 1:30 वाजेच्या सुमारास जामनेर रोडवरील हॉटेल भागाई मधील वेटर नामे नजाकत अली उर्फ मेजवान युनूस अली (जखमी) यास आरोपी वेटर नामे कमलेश शाळीग्राम जवरे, वय 24, हल्ली रा. चोरवड ता. भुसावळ मूळ रा. देऊळगाव गुजरी, ता. जामनेर याने त्याचे मानेवर, तोंडावर, डोळ्याच्या वर कांदा कापन्याच्या सुरीने मारून जखमी केले आहे. जखमी व आरोपी यांनी दारू पिऊन दारूच्या नशेत शिवीगाळ करून कांदा कापन्याच्या सुरीने वार केले आहे.
सदर जखमी यास उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल, जळगांव येथे ऍडमिट केले आहे. आरोपी ताब्यात आहे.या बाबत भुसावळ तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला असून तपास – पोलीस निरीक्षक महेश गायकवाड करीत आहेत.