प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील वराडसिम – जोगलखोरी येथील महिलांनी शासकिय घरकुल योजनेचा लाभ मिळावा , अतिक्रमित केलेल्या जागा नियमीत कराव्यात आणि घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करुन मिळावी यासाठी जोगलखोरी व वराडसिम येथील आदिवासी समाजाच्या महिलांनी सामाजिक कार्यकर्ते अक्षय सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे मागणी करणारे निवेदन दि.६ फेब्रुवारी रोजी दिले.
निवेदनात म्हटले आहे की आम्ही राहत असलेल्या अतिक्रमित जागा नियमाकूल करण्यात याव्यात , त्याच जागेवर शासकिय घरकुल मिळावे , गावातील काही लोक आम्ही राहत असलेल्या जागा बळकविण्याच्या प्रयत्नात आहेत त्या लोकांवर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली आहे निवेदनावर लिलाबाई भिमा सोनवणे, अरुणा भरत मोरे, चेतन चंदू गायकवाड ,प्रतिभा सुरसिंग मोरे ,हरचंद रामा गायकवाड , सुनिता वामन ठाकरे ,मिराबाई चंदू गायकवाड, धनराज रघुनाथ मोरे, कमल रतन गायकवाड, आशाबाई रतन ठाकरे, अंबादास विठ्ठल मोरे ,अमोल सोमनाथ माळी, सुमित्रा वामन मालचे ,सुलाबाई नामदेव पवार, दशरथ धनराज वाघ, भरत धनराज वाघ,मुकेश सोमनाथ वाघ, गोपीनाथ सोमनाथ माळी, शांताराम गोविंदा मोरे, संगीता राजू गायकवाड ,सिंधूबाई जयसिंग मोरे ,रतन गोमा गायकवा, मंगल उत्तम गायकवाड व इतर आदिवासी समाजातील लोकांची नावे आहेत.