बस आणि ट्रकची समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत बसने पेट घेतला. यानंतर लागलेल्या भीषण आगीमध्ये बसमधील 48 जणांपैकी 38 प्रवासी आणि दोन्ही चालकांचा मृत्यू झाला, तर ट्रक चालकाचाही अपघातात मृत्यू झाला.
भीषण धडक होताच बसने लगेच पेट घेतला आणि प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. अपघातानंतर बस पूर्णपणे जळून खाक झाली. यानंतर बसचा फक्त सांगाडा शिल्लक राहिला. आतापर्यंत फक्त 18 जणांची ओळख पटली आहे. बचावकार्य अजूनही सुरू आहे. ही घटना मेक्सिकोच्या ताबास्को राज्यात घडली. बस ऑपरेटर कंपनी टूर्स अकोस्टा यांनी सोशल मीडियावर अपघाताबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. बस वेगमर्यादेत होती की नाही हे ठरवण्यासाठी ते अपघाताची चौकशी करण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत काम करत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.