प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील गोजोरा येथे ग्रामपंचायत कार्यालय , मराठी शाळा व ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्याच प्रमाणे कुऱ्हा पानाचे रस्त्यावर असलेल्या छत्रपती गृप नावाने असलेल्या पाणपोई ची सुरवात करण्यात आली यावेळी वर्गणी गोळा करून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना तसेच वाहनधारकांना भर ऊन्हाळ्यात थंड पाणी मिळावे यासाठी मातीचे रांजण आणण्यात आले या पाणपोई जवळ सुध्दा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.
यावेळी गोजोरे गावातील पदाधिकारी व तरुण मंडळी तसेच छत्रपती गृप चे युवक उपस्थित होते.