एकात्मिक बालविकासाच्या पर्यवेक्षिका सौ एस.पी.महाजन यांच्या मनमानी कारभाराबाबत बदलीची मागणी

0
95

मदतनीस यांना दिल्या जाणाऱ्या त्रासाबाबत त्यांची तात्काळ बदलीसाठी तक्रार दाखल.

जळगाव – : ए.बा.वि.से. योजना ममुराबाद बिटाच्या पर्यवेक्षिका एस.पी. महाजन ह्या ममुराबाद येथील सेविका तसेच मदतनीस यांना सतत अश्लील स्वरूपाच्या शिवीगाळ करत असतात. शेंबडी, घोडी, ‘ढ’ ढगाची, घोड्यासारख्या वाढल्या पण अक्कल नाही आली, लाजा वाटत नाही, जळगांवमध्ये डवरतात, शरीराने वाढल्या पण अक्कल नाही आली, तुमचा सत्यानाश होईल असे बोलुन त्यांचे मानसिक खच्चीकरण करतात व बऱ्याचवेळा लहान मुलांसारख्या उठबशा सुद्धा घालायला सांगतात, जर एखाद्या सेविकेने किंवा मदतनीसने तसे नाही केले तर मारायला अंगावर धाऊन येतात.असे देखील तक दिलेल्या तक्रारी अर्जामध्ये म्हटले आहे.                                                                                                अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांच्या रजा शिल्लक असूनही रजा मंजुर करण्यासाठी पैशांची मागणी करतात, पैसे नाही दिले तर मानधन कपात करण्याची धमकी देत असतात. शासनामार्फत दिला जाणारा प्रोत्साहन भत्ता, स्टेशनरी भत्ता, भाऊबीज रक्कम, मोबाईल रिजार्च, गणवेश भत्ता, प्रवास भत्ता व सि.बी.ई. कार्यक्रमाच्या रक्कमेतुन टक्केवारीने पैसे मागतात, नाही दिल्यास तुम्ही कोणाकडेही गहाण रहा पण मला पैसे द्या, नाही तर तुम्हाला पाहून घेईन अशी धमकी सुद्धा त्यांच्याकडून नेहमी दिली जात असते. तसेच रात्री-अपरात्री फोनवर व्हॉटस् अॅपवर आत्ताच माहिती द्या नाही तर मानधन कपात करेन अशा सुद्धा धमक्या त्यांच्या कडुन दिल्या जातात. पर्यवेक्षिका एस.पी. महाजन यांच्याद्वारे दिल्या जाणाऱ्या त्रासाने परिसीमा गाठली असुन आमच्या सहनशिलतेचा अंत झाला आहे.पर्यवेक्षिका एस.पी. महाजन यांची ममुराबाद बिटातुन तात्काळ बदली करावी. तसेच यापुढे आम्ही एस. पी. महाजन मॅडम यांना कोणत्याही प्रकारचे रिपोर्टीग करणार नसल्या बाबतची तक्रार ममुराबाद येथील आंगणवाडी सेविका व मदतनीस अनिता रमेश पाटील,वनिता कमलाकर वाणी,संगीता सुभाष पाटील,मात्रा कैलास पाटील,प्रमिला ज्ञानदेव चौधरी,मंगला कैलास पाटील,रेखा संजय पाटील,कल्पना मनोज पाटील,माधुरी शशिकांत सोनव‌णे, सुरेखा राजेन्द्र सोनवणे ,मीराबाई यशवंत साळुंखे सेविका, निता महेश देशमुख,मिना उल्हास पाटील,विद्या ज्ञानदेव सोनवणे, यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी,ए. बा. वि. से.योजना तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी जळगांव यांना देण्यात आलेली आहे.

Spread the love