प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील वराडसिम येथील पंडित नेहरू विद्यालयात इयत्ता दहावी ची परीक्षा सुरळीत सुरु असून भुसावळ तालुका पोलीस स्टेशन चे पो नि महेश गायकवाड साहेब स्वत: थांबून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या परिक्षा केंद्रावर दादासाहेब दामू पांडू पाटील माध्यमिक विद्यालय सुनसगाव , पंडित नेहरू विद्यालय वराडसिम , राजाराम धोंडू बडगुजर विद्यालय कुऱ्हा पानाचे , आश्रम शाळा गंगापुरी , मांडवेदिगर ,या शाळांचे विद्यार्थी परीक्षा देत आहेत .यावर्षी शिक्षण विभागाने ऊर्दू हायस्कूल भुसावळ येथील मुख्याध्याक व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांची केंद्रप्रमुख , उपकेंद्र प्रमुख व पर्यवेक्षक नियुक्ती केली आहे. या परीक्षा केंद्रावर तालुका पोलीस व कुऱ्हा पानाचे दुरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी , होमगार्ड ,पोलीस पाटील यांनी चोख बंदोबस्त तैनात केला असून परीक्षा सुरळीत व शांततेत सुरु आहे.