धनंजय मुंडे प्रमुख गुन्हेगार ठरणार? दुसऱ्या टप्प्यातले पुरावे तयार, धनंजय देशमुखांचा गर्भित इशारा

0
42

संतोष देशमुख खून प्रकरण अथवा खंडणी प्रकरणात धनंजय मुंडे यांचा कसलाही सहभाग नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. तसंकाही असतं तर सीआयडीच्या तपासामध्ये पुढे आलं असतं.

मलाही तसंकाही वाटत नाही, असं फडणवीस बोलले होते. मात्र मयत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी आपल्याकडे पुरावेत आणि ते घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं म्हटलं आहे.

धनंजय देशमुख म्हणाले की, या केसचा पार्ट टू चालू झाला आहे. पहिल्या दिवशी मुख्य आरोपी छाती ठोकून सांगत होता की, आरोपींना फाशी द्या आणि स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. आता तो मुख्य आरोपी झाला आहे. आता दुसऱ्या भागात आम्ही जे लोक स्वतःला निर्दोष समजत आहेत, त्यांचे पुरावे देणार आहोत. मुख्यमंत्री म्हणाले सीआयडीला काही पुरावे मिळाले असते तर आणखी गुन्हेगार झाले असते. परंतु तपास अजून संपला नाही. पुरवणी चार्जशीट दाखल होणं बाकी आहे. षड्यंत्र करणारे सगळे लोक आरोपी आहेत, हे त्यांनाही माहिती आहे आणि समाजालाही माहिती आहे. परंतु अजून कागदावर आलेलं नाही.

धनंजय देशमुख पुढे म्हणाले की, आम्ही जसं सगळे पुरावे आणि संपूर्ण घटनाक्रम ७ जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांना दाखवला होता. त्याची दखल गृह खात्याने घेतली आणि समित्या स्थापन करुन तपास झाला. त्यानंतर मग जो स्वतःला आरोपी मानत नव्हता तो मुख्य आरोपी झाला. या दुसऱ्या भागातही आमच्याकडेच पुरावे आहेत ते ऑफिशली आहेत, अधिकृत आहेत, ते सगळे पुरावे आम्ही समाजाला आणि मुख्यमंत्री साहेबांना दाखवून देणार आहोत. जे म्हणताएत आम्ही गुन्हेगार नाहीत, त्यांच्याबद्दलचे हे पुरावे आहेत. जे गुन्हेगार आता बाहेर आहेत, ते प्रमुख भूमिकेत येतील याचा आम्हाला विश्वास आहे.

”या घटनेचा दुसरा भाग सुरु झाला आहे. फरार आरोपी जेव्हा सापडेल, तोही भरपूर गोष्टी समोर आणेल. त्यानेही नाही आणलं तर आम्ही प्रत्येक पुरावे देणार आहोत. न्यायालयीन समितीला सर्व पुरावे देणार आहोत. कुणी आरोपी पोसले होते, कुणी पाठराखण केली हे सगळं स्पष्ट होणार आहे.” असा गर्भित इशारा धनंजय देशमुख यानी दिला. त्यामुळे मंत्रिपदापासून मुक्त झालेले धनंजय मुंडे या प्रकरणात अडकतील का? हाच प्रश्न आहे.

Spread the love