जळगाव जिल्ह्यातील १२ ग्रामपंचायतीचे १७ ग्रामपंचायत सदस्य अपात्र

0
56

जळगाव -: जिल्ह्यातील १२ ग्रामपंचायतीचे १७ ग्रामपंचायत सदस्य अपात्र करण्यात आले असून याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांनी काढले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

ग्रा.पं. सदस्यांसह सरपंचाविरोधात दाखल जिल्हाधिकाऱ्यांनी ३२ प्रकरणात सुनावणी पूर्ण करून आदेश जारी केले आहेत. १२ तक्रारदारांनी माघार घेतल्यानंतर संबंधित प्रस्ताव निकाली काढण्यात आले आहेत. (JSN)तक्रारींमध्ये अतिक्रमणासह तिसरे अपत्य व निवडणूक खर्च मुदतीत सादर केला नसल्याच्या तक्रारींचे प्रमाण जास्त होत.

Spread the love