आठवळा भर कपडेही बदलले नाहीत, मिळेल ते खाल्ले अन् सोनचोरांना पकडले! 

0
48

एखाद्या मौल्यवान वस्तूची चोरी झाल्यास ती परत मिळाल्याचा आनंद वेगळाच असतो. मात्र पोलिसांनी अशी कामगिरी केली यावर विश्वास बसणे थोडे अवघड असते. अमळनेरच्या पोलिसांनी असेच लक्षणीय काम करून दाखवल्याने सध्या तो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

पोलिसांनी उघडकीस आणलेला हा सोने चोरीचा तपास कौतुक करावा असाच होता. तपास करताना पोलिसांनी सलग सात दिवस पाठलाग करीत रस्त्यातील ३६५ सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. सीसीटीव्ही फुटेज तपासात आरोपीचाशोध घेत ते पुढे पुढे जात राहिले. या कालावधीत त्यांना कपडे देखील बदलता आले नाही.

शिंदखेडा (धुळे) येथील प्रतिभा जिजाबराव पाटील (वय ४८) ही महिला विवाह समारंभासाठी जात होती. धरणगाव येथून त्या जळगाव दोंडाईचा येथे त्या बसमध्ये बसल्या. यावेळी त्यांच्या शेजारी दोन महिला येऊन बसल्या. काही वेळाने या महिला बसमधून उतरल्या. तेव्हा संबंधित महिलेचे नऊ तोळ्यांचे दागिने चोरी झाल्याचे स्पष्ट झाले.

प्रतिभा पाटील यांनी तातडीने अमळनेर पोलीस ठाणे गाठले. त्यांनी परीक्षाविधीन उपाधीक्षक केदार बारबोले यांना ही घटना सांगितली. बारबोले यांनी तातडीने हालचाली करीत हा तपास सुरू केल्या. त्या दोन महिलांचा शोध सुरू केला. त्यातून या आव्हानात्मक तपासाला प्रारंभ झाला.

सोनो चोरणाऱ्या महिला पैलाड नाका येथून दुसऱ्या बसने जळगावला गेल्याचे आढळले. जळगाव बस स्थानकातून त्या रिक्षाने कुसुंबा विमानतळ परिसरात गेल्या. तेथे पोलीस माग काढत पोहोचल्यावर त्यांनी पुन्हा गुंगारा दिला. त्या गाडीने अकोला येथे गेल्या. अकोला येथून दुसऱ्या गाडीने त्या बार्शी टाकळी येथे जाऊन परत अकोला येथे आल्या.

अकोला येथून त्या परतवाडा येथून रिक्षाने महामार्ग चौफुली येथे पोहोचल्या. तेथे त्यांचे बस्तान होते. मात्र पोलिसांचा संशय आल्याने त्या पुन्हा दुसऱ्या गाडीने अंजनगाव, इंदूर मार्गे वरुड (जि. अमरावती) येथे पोचल्या. या सबंध कालावधीत त्या रस्त्यावरच मुक्काम करीत असल्याने त्यांची माहिती घेत शोध घेणे एक आव्हान होते.

या सबंध मार्गावर पोलीस प्रत्येक ठिकाणी जाऊन विविध सीसीटीव्ही फुटेज तपासत. त्यांचा माग काढत होते. सलग सात दिवस कपडेही (JSN) न बदलता आणि रस्त्यात मिळेल ते खाऊन पोलिसांनी हा पाठलाग केला. शेवटी त्यांना त्यात यश आले. सोने चोरणाऱ्या दोन महिलांसह त्यांच्या गॅंग मधील अन्य दोन महिलाही हाती लागल्या.

परीक्षाविधीन उपाधीक्षक नामदेव बोरकर यांसह हवालदार प्रशांत पाटील, मिलिंद सोनार, विनोद संधानशिव, निलेश मोरे, उज्वलकुमार म्हस्के, महिला होमगार्ड नीलिमा पाटील या पथकाने रात्रंदिवस परिश्रम घेत हा अत्यंत क्लीस्ट तपास यशस्वी केला. सात दिवस त्यांना कुठेही चांगली मुक्कामाची जागा किंवा कपडे बदलण्याची ही संधी मिळाली नाही.

तपासादरम्यान मुक्काम अथवा कपडे बदलण्यासाठी विश्रांती घेतली असती, तर हा तपास लागणे अशक्य होते. प्रत्येक ठिकाणी त्यांना अशी आव्हाने येतच होती. त्यावर त्यांनी मोठ्या आत्मविश्वासाने अखंड परिश्रम करीत पोलीस तपासाचे एक आदर्श उदाहरण पुढे केले.

Spread the love