भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धार्मिक स्थळ सुरक्षेबाबत सभा .

0
33

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – दिनांक 20/03/ 2025 रोजी भुसावळ तालुका पोलीस स्टेशन येथे मुस्लिम समाजाचे मौलाना, मंदिर ट्रस्ट चे पदाधिकारी यांची भोंगे संदर्भात व रमजान च्या निमित्ताने मीटिंग आयोजित करण्यात आलेली होती. सदर मिटिंगमध्ये धार्मिक स्थळ, मंदिरे, येथे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कॅमेरा लावणेबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच धार्मिक स्थळांना व मंदिरांना लाऊड स्पीकर लावणे बाबत मा. सर्वोच्च न्यायालयाचे आदेशाचे पालन करून नियमानुसार (JSN) परवानगी काढून घेण्यात यावी, व आपले धार्मिक स्थळाची सुरक्षा करणेबाबत पो नि महेश गायकवाड यांनी योग्य सूचना व मार्गदर्शन केले. आगामी सण व रमजान शांतपणे पार पाडणेबाबत सूचना व मार्गदर्शन करण्यात आलेली आहे. सदर मिटिंग साठी तालुका हद्दीतील 30 ते 35 धार्मिक स्थळांचे व मंदिराचे पदाधिकारी हजर होते.

यावेळी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Spread the love