भुसावळ डिगंबर नगरात कथा व किर्तन सप्ताहाचे आयोजन.

0
31

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ -:  येथील जामनेर रोड डिगंबर नगर स्वामी समर्थ काँलनी हिमालय पेट्रोल पंप च्या मागे श्रीमद् भागवत कथा व किर्तन सप्ताहाचे आयोजन दि.२० ते २७ मार्च या कालावधीत करण्यात आले आहे. कथा वाचक हभप सुरेश महाराज तळवेलकर हे असून दि.२० पासून अनुक्रमे सर्वश्री हभप गजानन महाराज कुऱ्हा काकोडा , गणेश महाराज सरनाईक वाशिम, नितीन महाराज मलकापूर, राध्येशाम महाराज आळंदी, दिपक महाराज भुसावळ, प्रभाकर महाराज कुंड ,दत्तात्रय महाराज साकरी(JSN) यांचे किर्तन होणार असून दि.२७ रोजी रात्री ८ ते १० हभप सुरेश महाराज तळवेलकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.मृदंगाचार्य सज्जन महाराज सुरशे आळंदी तर गायनाचार्य ज्ञानेश्वर महाराज रहारे मेहकर, वैभव महाराज कावळे आळंदी हे राहणार असून २७ रोजी संध्याकाळी ४ ते ६महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सर्व भाविकांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन मुक्ताई महिला मंडळ डिगंबर नगर व नागरीकांनी केले आहे.

Spread the love