किरकोळ वादातून माजी उपसरपंचाचा निर्घृण खून !

0
52

भादली येथील घटनेने खळबळ

जळगाव :- भादली गावात किरकोळ वादाचे रूपांतर थेट खुनात झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी ८ वाजता घडली. अज्ञात तिघांनी ३६ वर्षीय माजी उपसरपंचाच्या छातीत धारदार शस्त्राने वार करत त्यांचा निर्घृण खून केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून गावात भीतीचे वातावरण आहे.

मृत युवराज सोपान कोळी (वय ३५, रा. कानसवाडा, ता. जळगाव) हे आपल्या कुटुंबासह भादली येथे राहत होते. शेती करून उदरनिर्वाह (JSN)  करणाऱ्या कोळी यांचा गुरुवारी रात्री कोणाशी तरी वाद झाला होता. या वादाचा परिणाम म्हणून शुक्रवारी सकाळी अज्ञात तीन जणांनी त्यांच्यावर धारदार चाकू व चॉपरने प्राणघातक हल्ला केला.

हा थरारक प्रकार काही शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर घडला. त्यांनी धाव घेतली तेव्हा मारेकरी पसार झाले होते. गंभीर जखमी अवस्थेत युवराज कोळी यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Spread the love