भुसावळ शहरात सराईत गुंड मुकेश भालेरावची क्रूर हत्या: खुनाचे सत्र सुरूच 

0
50

भुसावळ -:शहरातील कुख्यात गुंड मुकेश प्रकाश भालेराव (वय ३१, रा. टेक्नीकल हायस्कूल मागे, भुसावळ) याची क्रूर हत्या करून त्याचा मृतदेह तापी नदीच्या परिसरात पुरून टाकल्याची धक्कादायक घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

मुकेश भालेराववर खून, मारहाण, लुटमार, धमकी, खंडणी यांसारखे तब्बल २६ गंभीर गुन्हे दाखल होते. पूर्वी त्याला नाशिक येथे स्थानबद्ध करण्यात आले होते. मात्र, स्थानबद्धतेतून बाहेर आल्यानंतर तो पुन्हा भुसावळात वास्तव्याला होता.

मुकेश भालेराव याला सुमारे चार दिवसांपूर्वी काही तरुण घरातून घेऊन गेले होते. त्यानंतर तो बेपत्ता होता. त्याचा शोध घेऊनही तो सापडत नसल्यामुळे आज सकाळी त्याच्या पत्नीने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ( J S N )सायंकाळी सात वाजेच्या सुमारास मुकेशचा मृतदेह तापी नदीच्या काठावर पुरल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पुढील तपास पोलिस उपअधीक्षक यांच्याकडे आहे.

मुकेश भालेरावच्या टोळीवर मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल असून त्याच्या हत्येमागे टोळीयुद्ध असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, पूर्वीच्या वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

शहरात खळबळ, टोळी युध्द पुन्हा सुरू?

मुकेशच्या हत्येमुळे भुसावळ शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. शहरातील गुन्हेगारी टोळ्यांमधील संघर्ष पुन्हा उफाळून येण्याची भीती व्यक्त होत आहे. नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पोलिसांनी ठोस कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

या घटनेमुळे भुसावळातील शांतता भंग होण्याची शक्यता आहे. पुढील तपासातून या हत्येमागील सत्य उघड होईल, अशी अपेक्षा आहे.

Spread the love