धरणगाव -: तालुक्यातील धरणगाव खर्दे बुद्रुक, येथील ग्रामसेवक नितीन भीमराव ब्राम्हणे यांनी कामाची बिले व सदर बिलांचे २ चेक काढून दिले या कामाचा मोबदला पंचवीस हजार रुपयांची लाच ता.२२ रोजी घेतांना अटक झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे की,तक्रारदार यांनी त्यांचे गावात गटारीचे २ लाखाचे व गावहाळ बांधण्याचे ७०,००० रुपयाचे अशी २,७०,००० रुपयाचे काम केले होते.ग्रामसेवक यांनी तक्रारदार यांचे दोन्ही कामाचे बिल काढुन देऊन, सदर कामाचे बिलाची एकूण रक्कम २,६४,००० रुपये तक्रारदार यांच्या खात्यात जमा झाली होती.या कामाचा मोबदला म्हणून ग्रामसेवक यांनी तक्रादार यांच्याकडे १० टक्क्याप्रमाणे २५,००० रुपये लाचेची मागणी केले बाबत २२ मार्च रोजी तक्रार दिली. तुम्ही जवळचे असल्याने २५,००० रुपये द्यावे लागतील, तुम्ही सरपंच ला देखील काही देत नाही असे सांगून २५,००० रुपयाची स्पष्ट मागणी करुन लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली व लाच रक्कम तात्काळ आणून देण्याबाबत तक्रारदार यांना सांगितले.त्यावरुन सापळा कारवाई करण्यात येवून ग्रामसेवक यांना २५,००० रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले असून यांचे विरुध्द धरणगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.