जळगाव -देशात इतर अनेक राष्ट्रीयकृत बँका असताना जिल्हा बँक का सुरु केली?काय गरज होती?याबाबत शेतकऱ्यांना माहिती नाही.म्हणून ते त्या बँकेला सरकारी बँक समजतात.”साहेब, साहेब माझ्या कर्जाचे काय झाले?”असे विचारतात.
साहेब म्हणतो,”पाटील भाऊसाहेब सुटीवर गेले आहेत.तुम्ही पुढच्या सोमवारी या.”
जरी पाटील भाऊसाहेब तेथेच बसलेला असला तरी असे उत्तर मिळते.बिचारा शेतकरी त्या भाऊसाहेब ला ओळखत नाही. तो शेतकरी कामधाम सोडून पुन्हा सोमवारी येतो. तेंव्हा वेगळेच उत्तर मिळते.तर मग,कोणाकडे जावे?कोणाकडे तक्रार करावी? हा प्रश्न सताऊ नये म्हणून स्थानिक लोकांचे संचालक मंडळाची सोय करण्यात आली.संचालक शेतकरी , चेयरमन ही शेतकरी. खातेदार ही शेतकरी. बाहेर शेतकरी, आत शेतकरी.म्हणून ही शेतकऱ्यांची बँक म्हणतात.
पण आता येथे कोणीच शेतकरी संचालक नाही. शेतकरी चेयरमन नाही. जे आहेत त्यांच्याकडे शेती असेलही पण तो शेतकरी नाही. तुम्ही सांगा,कोण शेतकरी संचालक होता?एकही शेतकरी नाही.ते शेतीचे मालक आहेत.याला सातबारा वरचे शेतकरी म्हणतात. शेतीचे मालक आहेत.पण स्वतः शेती करीत नाहीत. दुसऱ्याकडून शेती करून घेतात.जसे जळगाव महानगरपालिकेत एक माणूस सफाईवाला नोकरीवर आहे. तो माणूस दुसऱ्या माणसाला मजूरीवर ठेवून झाडू मारून घेतो.स्वतः १५ हजार पगार घेतो,आणि मजूराला ५ हजार देतो. सफाईवाला आहे पण सफाई कधीच करीत नाहीत. असे हे संचालक शेतीचे मालक आहेत पण शेतकरी किंवा शेतमजूर नाहीत.तर यांना पिंप्राळा, टाकरखेडा,रवंजे,धानवड,उंदिरखेडे च्या शेतकऱ्यांची समस्या कळणारच नाही. शिवाय हे संचालक शेतकऱ्यांसाठी संचालक बनलेच नाहीत. तसे असते तर त्यांनी एका मताचे दोन लाख दिलेच नसते.हातात एक कोटी असतील त्यानेच जेडीसीसी मधे उमेदवारी करावी. नाहीतर चुपचाप अर्धी टाकून झोपून राहावे. असा प्रघात आहे.पण आम्ही आता हा प्रघात मोडीस काढत आहोत.
जेडीसीसी चे संचालक हे आधिकतम आमदार आहेत.कोणी आजीमाजी मंत्री आहेत. तरीही यांना काय खाज दाटली,संचालक बनण्याची? हिंमत असेल तर विचारून बघा.विचारले तरी तो सांगेल ,” मला शेतकऱ्यांची सेवा करायची आहे. “बोला.सेवा करायची असेल तर ,इतके पैसे ओतून?कोटी कोटी खर्च करून?कसे शक्य आहे?हे कळण्यासाठी जास्त बुद्धी ची गरज नाही. याला खेड्याच्या भाषेत लुग्गा म्हणतात. एक गोटी लावली कि दोन गोट्या जिंकतो.एक कोटी लावले कि दोन कोटी काढतो.आणि तरी म्हणे ही सेवा !
शेतकरी बांधवांनो,ही मोनोपॉली ,ही मक्तेदारी, ही खाबूगिरी आम्ही मोडून काढत आहोत.चारही शिरजोर पक्षांची ” बंद दरवाजा आड” बैठक झाली. आपसात ठरवले.”आपण जेडीसीसी बँक निवडणूक बिनविरोध करू.कोणालाच सांगू नका.आपण चार सोडून पांचवा कोणीच नको. जिल्हा बँक हिणीमीणी ,वाटून निटून खाऊ.”
” अरे! ती काय शिकार आहे,चार भाऊ आपसात वाटून घ्यायला? ”
नाही. मुळीच नाही. ही जिल्हा बँक शेतकऱ्यांची आहे. सहकारी आहे.तुमची आमची सर्वांची आहे.पण शेतकरी अशिक्षित असल्याने काही लोकांनी ती बळकावली आहे. आता पुन्हा तसे होणे नाही. आम्ही वंचित शेतकरी शहाणे झालो आहोत.आम्ही जागृत झालो आहोत.आम्ही जागृत जनमंच ला जोडले गेलो आहोत.आम्ही उमेदवारी करणार. आम्ही निवडणूक लढणार.विकास सोसायटी,दूध बेडर व इतर संस्थांच्या सदस्यांना मतदानाची संधी मिळवून देणार.आम्हाला हवा तो संचालक निवडून देणार.
विकास सोसायटी, दूध फेडरेशन व इतर संस्थाँचे मतदानास नामोनित सदस्यांनो,तुम्हाला हे धनदांडगे उमेदवार पैशाचे प्रलोभन देतील,पदाचे प्रलोभन देतील, नोकरीचे प्रलोभन देतील. पण तुम्ही तुमच्या सोसायटीच्या, दूध डेअरीच्या ,इतर संस्थांच्या सदस्यांचा विश्वासघात करू नका.या बेईमानीत शेतकरी बांधवांचे नुकसान आहे,नाश आहे.तुम्हाला शाप आहे.एक वेळ पैसा घेऊन गब्बर व्हाल पण येथूनच तुमचा ऱ्हास सुरू होईल .आमदार, मंत्री,साखर कारखाना, जेडीसीसी, दूध फेडरेशन असे सर्वच खिशात असतांना जेलमधे जावे लागत आहे.ही अवस्था खूप वाईट असते.नरकवास आहे.आणि येथेच भोगायचा आहे.ज्यांनी ज्यांनी भोगलेला आहे त्यांना जाऊन भेटा.विचारा,” अस्सं कस्सं झाले रे,भाऊ?”












