कार पलटून चालक जागीच ठार

0
25

नांदुरा : कार पलटी होऊन चालक जागीच ठार झाल्याची घटना नांदुरा – जळगाव जामोद रोडवरील निमगाव फाट्या दरम्यान पाइप फॅक्टरीजवळ २७ मार्च रोजी सकाळी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जामोद तालुक्यातील तिवडी येथील रहिवासी व आता नांदुरा येथे स्थायिक झालेले पुरुषोत्तम निवृत्ती घाईट (४०) हे २७ मार्च रोजी कार क्रमांक एमएच १२, एलजे ६७६५ ने तिवडी कडून नांदुरा येथे येत होते.
दरम्यान निमगाव फाट्यानजीक त्यांचे कारवरील नियंत्रण सुटून पाईप फॅक्टरीसमोर अपघात झाला.

या अपघाताची माहिती मिळताच ओम साई फाउंडेशनच्या सदस्यांनी घटनास्थळावर पोहचून जखमी पुरूषोत्तम घाईट यांना उपचारार्थ प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरा येथे नेले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मीनारायण जयस्वाल यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

याप्रकरणी विष्णु येलु घाईट, रा. बालाजी नगर यांनी नांदुरा पोलिस स्टेशनला फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मृतक पुरुषोत्तम घाईट यांचे पश्चात पत्नी, २ मुले, असा बराच आप्त परिवार असून आहे.

नांदुरा जळगाव जामोद या अत्यंत वर्दळ असणाऱ्या रोडवर सकाळी मॉर्निंग वॉक व रस्त्यावर सूर्यनमस्कार काढणाऱ्यांना वाचवण्याच्या प्रयत्नातच सदर अपघात घडल्याचे घटनास्थळावर बोलल्या जात होते. तरी नांदुरा ठाणेदारांनी अत्यंत रहदारीच्या रस्त्यावर मॉर्निंग वॉक तसेच व्यायाम करणाऱ्यांना समज देऊन यापुढे होणाऱ्या अनर्थ टाळावे अशी रास्त मागणी परिसरातील सुज्ञ गावकरी करीत आहेत.

Spread the love