प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ -: तालुक्यातील कुऱ्हा पानाचे येथे गुढीपाडव्या च्या दिवशी जेष्ठ नागरीक सभागृहाचे लोकार्पण राज्याचे वस्रोद्योग मंत्री ना. संजयभाऊ सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून भुसावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डाँ. सचिन पानझडे यांच्या मार्गदर्शनाखाली कुऱ्हा पानाचे सरपंच सौ दुर्गाबाई सुरेश शिंदे व ग्रामविकास अधिकारी संतोष मोरे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अपंगांच्या कल्याणासाठी दिला जाणारा पाच टक्के निधी रकमेचा धनादेश प्रत्येकी २५०० /- रुपये असा ८० लाभार्थी यांना देण्यात आला. शासनाच्या नियमानुसार प्रत्येक ग्रामपंचायती मध्ये दिव्यांग / अपंग यांना या निधीची वाटप करण्यात येते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद (JSNN)सदस्य समाधान पवार होते.या प्रसंगी शिक्षण मंडळाचे चेअरमन एकनाथ बडगुजर, जेष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष कालिदास कळसकर सर, उपाध्यक्ष रविंद्र गांधेले , सचिव भागवत टोंगळे, कोषाध्यक्ष लहानू पाटील व जेष्ठ नागरीक तसेच सरपंच सौ. दुर्गाबाई सुरेश शिंदे, सदस्य निर्मला गोविंदा पाटील, किशोर कोळी, सावकार पारधी, भुसावळ तालुका भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष रोहन पवार, तलाठी दामिनी महाजन व लाभार्थी उपस्थित होते. यावेळी श्री रेणूका माता सामाजिक सभागृह येथे कार्यक्रम पार पडला.
गावातील जे कोणी अपंग असतील आणि त्यांच्याकडे ४० टक्के किंवा जास्त अपंग प्रमाणपत्र असेल त्यांनी कुऱ्हा पानाचे ग्रामविकास अधिकारी संतोष मोरे यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन संतोष मोरे यांनी केले आहे.