दूधवाला भैय्या असतो तसा शाळावाला भैय्या कोण 

0
38

जळगाव – गावा मध्ये एखादा दुध वाला भैय्या असतो त्याच्याकडे शेकडो म्हशी राहतात आणि तो त्यातून दुधाचा व्यवसाय करून पैसे कामावत असतो.

तशाच पद्धतीचा एक शिक्षण सम्राट शाळा वाला भैय्या म्हणून उदयास आला आहे.

याच्या कडे डझनभर शाळा आहेत. त्यातील 90% टक्के शाळा दुसऱ्या तालुक्यातून विकत आणून विविध गावात पत्रे मारून उभ्या केल्या आहेत.या शाळा काही समाजसेवा किंवा विद्यार्थ्यांचे भविष्य घडावे म्हणून सुरु केल्या गेल्या नाहीत. तर या शाळेत बोगस शिक्षक भरती करून करोडो रुपये कमावून आपलं भविष्य सुधारावे यासाठीच या शाळा खोलण्यात आला आहेत.

एकप्रकारे जुन्या शाळा विकत आणायच्या त्या एखाद्या मोठ्या गावात स्थलांतर करायच्या. जो शाळेसाठी मोफत जमीन देणार त्याच्या मुलाला शिपाई ची ऑर्डर द्यायची आणि उर्वरित 12 ते 15 शिक्षक भरती प्रत्येकी 35 लाख रुपये घेऊन करून घ्यायची. त्या पैशातून शाळा विकत आणण्याचा खर्च 60ते 70 लाख रुपये पत्रे मारून शाळा उभी करायचा खर्च 8ते 10 लाख रुपये, बेंच, फळे वगैरे किरकोळ खर्च वजा जाता यांना एक शाळा सुरु करून शिक्षक भरती करून 2 ते 5 कोटी रुपये नफा आरामात राहतो असं जाणकार सांगतात.

याप्रमाणे या शाळा वाल्या भैय्याने डझनभर शाळा सुरु करून तो आता कॉलेजच्या व्यवसायात उडी घेतांना दिसून येत आहे.

यांची कमी वेळात ही प्रगती शिक्षण विभागातील भ्रष्ट लोकांच्या आणि राजकीय पुढाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय शक्यच नाही.

या शाळा वाल्या भैय्या ने या अगोदर अपंग युनिट मधून करोडो रुपये छापले आहेत. तो अपंग युनिट व्यवसायात जळगाव जिल्ह्यात किंग मानला जातो. त्याचे सर्वच तालुक्यातील शाळेत बोगस अपंग युनिट कार्यरत असल्याची त्यावेळी चर्चा सुरु होती

नंदुरबार, पालघर, औरंगाबाद बोगस अपंग युनिट मॅटर मध्ये हा मोस्ट वान्टेड होता. व काही दिवस हा आणि याचा मेहुणा फरार देखील झाला होता.

याने ग्रामविकास विभागातून परस्पर बोगस सही शिक्के करून ऑर्डर काढण्याचा प्रयत्न केला होता. भरत पाटील नामक सचिवाच्या बनावट सह्या देखील घसडल्या होत्या. रीतसर इमेल जिल्हा परिषदेला येत असतो परंतु याने बनावट कागदपत्रे तयार करून चेंज रिपोर्ट तयार अनेक बोगस शिक्षक अपंग युनिट मधून जिल्हा परिषदेला वर्ग केल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

Spread the love