जळगाव -जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी इतर सहकारी संस्था मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज दाखल केला.इतर सहकारी संस्था मतदार संघातून यापूर्वी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष व सहकार विभागाचे जिल्हाध्यक्ष वाल्मीक पाटील आणि पाचोरा येथील प्रकाश पाटील यांनी उमेदवारी दाखल केली आहे.21 नोव्हेंबररोजी जिल्हा बँकेसाठी मतदान होणार आहे.श्री देवकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हा उपनिबंधक सुनील बिडवई यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अमळनेरचे आमदार अनिल पाटील, माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, राष्ट्रवादीचे सहकार विभागाचे जिल्हाध्यक्ष वाल्मीक पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.