अडावद चोपडा रस्त्यावर एसटी बसची मोटार सायकलला जोरदार धडक

0
77

चोपडा – चोपड्याहुन अडावदकडे जात असलेल्या एसटी बस व दुचाकीची जोरदार धडक झाली. अडावद कडुन चोपड्याकडे दुचाकीवरून येत असलेला दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. ही घटना अडावद दोन किलोमीटर अंतरावर चोपडा रस्त्यावर रविवारी दुपारी साडेतीन च्या सुमारास  घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की अडावद पासून चोपड्याकडे जात असताना दोन किलोमीटरच्या अंतरावर बस क्रमांक MH20BL-1408 ही चोपड्याहून अडावदकडे जात होती. समोरून येणाऱ्या दुचाकीस्वार संजय गोपाळ कोळी वय 35 राहाणार डांभुर्णी मोटर सायकल क्रमांक MH19BP-0437 ला बसने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.

दुचाकीस्वराला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी नागरिकांची धडपड

रुग्णवाहिकेला उशीर लागल्याने व दुचाकीस्वार गंभीररीत्या जखमी असल्याने त्याचा जिव वाचावा म्हणून नागरिकनी आतोनात प्रयन्त केले. अडावद कडुन चोपड्याकडे जात असलेल्या बसमध्ये दुचाकीस्वाराला उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी घटनास्थळी असलेल्या नागरीकांनी बस चालकाला विनंती करून देखील बस चालक दुचाकीस्वाराला घेऊन जाण्यास तयार नव्हता. त्यावेळी चोपड्याहुन जळगावकडे येत असलेले साप्ताहिक जळगाव संदेश चे संपादक महेंद्र सोनवणे, ममुराबाद ग्रा पंचायतीचे सदस्य अमर पाटील, सोबत असलेले समिर शेख, जुबेर पटेल, शफी पटेल, यांनी घटनास्थळी थांबुन चालक वाहकाला धारेवर धरल्याने दुचाकीस्वाराला बसमध्ये टाकुन त्वरीत उपचारासाठी चोपडा येथे हलवण्यात आले.

एसटी महामंडळाचा गलथान कारभार

अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वराला तात्काळ रुग्नालयात उपचारासाठी हलवण्यास विनंती करूण देखील बस चालक दुचाकीस्वराला चोपडा रुग्णालयात नेण्यास तयार नव्हते. चोपडा डेपोचे बस चालक एस व्हि सुल्ताने यांनी सांगीतले कि आम्हाला अपघातातील जखमीला बस मध्ये नेण्यासाठी आगार प्रमुखाचे परवानगी घ्यावी लागते. परंतु रुग्णवाहिका वेळेवर न आल्यास अपघात झालेल्या व्यक्तीचा जीव सुद्धा जाऊ शकतो म्हणून आगार प्रमुखांनी अशावेळी अपघात झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी बसमधुन तात्काळ हलविण्यास सांगावे

अपघात स्थळ अडावद पासून हाकेच्या अंतरावर असताना देखील अडावद पोलिसांची घटनास्थळी उशिरा हजेरी झाली. व त्यांनी रस्ता मोकळा केला

Spread the love