‘ जयभीम पँथर ‘ चित्रपट नव्या क्रांतीची प्रेरणा देतो : भंते पद्मपाणी

0
29

जळगाव :- आज राजकारणाची दिशा बदलत असून जातीय संघर्ष अधिक वाढत आहे अश्या पार्श्वभूमीवर ‘ जयभीम पँथर एक संघर्ष एका नव्या सामाजिक क्रांतीची परिभाषा घेवून येत आहे , नवा विषय , नवे संधर्भ घेवून हा चित्रपट येत असल्याने जनतेने त्यास मोठ्याप्रमाणात प्रतिसाद द्यावा असे आवहन भंते पद्मपाणी यांनी जिजाऊ नगर येथील बुद्ध विहारात चित्रपटाचे प्रमोशन करतांना केले. सुरवातीस त्यांनी भगवान बुद्ध , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन केले व , पंचशिल ग्रहण केले . त्यांच्या समवेत भंते बोधीप्रिय , भंते बोधीशिल हे सुध्दा होते .

प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी आपल्या मनोगतात सांगितले की , एखाद्या चित्रपटातून पँथर उभा करणे , सामजिक क्रांतीची परिभाषा मांडणे , सामाजिक , धार्मिक , जातीय व्यवस्था उभी करून ती बदलविण्याचा संदेश देणारा हा चित्रपट नक्कीच नवी दिशा देणारा ठरेल .

कास्ट ट्राईब संघटनेचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र तायडे यांनी हा चित्रपट ११ तारखेला जळगाव प्रदर्शित होत आहे . हा चित्रपट सामाजिक संघर्षावर आधारित असल्याने तो नक्की यशस्वी होईल असे मत मांडले .

भीम कन्या संघटनेच्या माधुरी साळुंके , सामाजिक कार्यकर्त्या भारती रंधे यांनी हा चित्रपट महिलांना नवी प्रेरणा देणारा असल्याने आम्ही महिला मोठ्या संख्येने हा चित्रपट पाहायला नक्की जाऊ असे सांगितले .

बुद्ध विहार समितीचे प्रमुख विनोद सपकाळे यांनी सूत्रसंचालन , कास्ट ट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापू साळुंके यांनी प्रास्ताविक तर सारा फाऊंडेशनचे प्रमुख डॉ. चंद्रकांत भालेराव यांनी आभारप्रदर्शन केले .

या प्रसंगी आशिष सपकाळे , सतिष गायकवाड , डी. एच. भास्कर , डॉ. अशोक हनवते , बी. एच. पवार तसेच वाघ नगर येथील स्त्री पुरुष मोठ्यासंख्येने हजर होते .

Spread the love