नशिराबादला १३ एप्रिल रोजी बारागाड्या !

0
40

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे गेल्या दोन शतकांची अखंड परंपरा असलेला खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवास शनिवार (ता. 12) पासून प्रारंभ होणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात बारागाड्या ओढणे, कठडे मिरवणूक, लोकनाट्य यासह विविध कार्यक्रम होणार आहेत.

सुनसगाव रस्त्यावर खंडेराव महाराजांचे पुरातन मंदिर आहे. दरवर्षी यात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम होतात. यात शनिवारी(12/04/2025) सकाळी आठला ‘श्रीं’ची पूजा व अभिषेक आणि सायंकाळी सत्यनारायण पूजा होणार आहे. रविवारी(ता. 13 ) सकाळी आठला महाअभिषेक व पूजन होईल. दुपारी 5 कठडे मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता भगत युवराज धोबी यांच्या हस्ते बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम होईल. रात्री नऊ ला मंगलाबाई महाजन केऱ्हाळेकर लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम होणार आहे तसेच सोमवार (ता. 14 ) सकाळी आठला ‘श्रीं’ची मूर्ती पंचामृत अभिषेक पूजन होईल. व रात्री 9 वाजे पासुन नथ्थु भाऊ सोनवणे भोकरकर व सहकारी यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम होईल गेल्या दोनशे वर्षांपासून धोबी घराण्याकडे बारागाड्या ओढण्याचा मान आहे. वैद्य प्रतिपदेला खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त बारागाड्या ओढण्याची परंपरा आहे. पिढ्या‌न्पिढ्या बारागाड्या ओढण्याची परंपरा धोबी घराण्याने सांभाळली आहे. आतापर्यंत (कै.) रघू धोबी, शंकर रघू धोबी, गणपत शंकर धोबी, दामू शंकर धोबी यांनी सलग

 

३५ वर्षे बारागाड्या ओढल्या. त्यांच्यानंतर मोतीलाल संपत धोबी यांनी १२ वर्षे बारागाड्या ओढल्या आणि त्यानंतर माजी ग्रामपंचायत सदस्य सुधाकर ऊर्फ सुदाम धोबी यांनी पाच वर्षे बारागाड्या ओढल्या. त्यांच्यानंतर बारागाड्या ओढण्याची धुरा युवराज मोतीलाल धोबी यांच्याकडे दोन वर्षांपासून आहे. खंडेराव महाराज यात्रोत्सवाचे अध्यक्ष लालचंद पाटील, उपाध्यक्ष योगेश पाटील, सचिव पंकज महाजन, खजिनदार ज्ञानदेव लोखंडे, किशोर पाटील , चंद्रकांत भोळे, प्रकाश बोंडे, किरण पाटील, मुकुंदा रोटे, विकास धनगर, विकास पाटील, चेतन बऱ्हाटे,बापु बोढरे, गणेश चव्हाण , विनोद रंधे, किर्तीकांत चौबे व गावातील गणेश मंडळ, दुर्गोत्सव मंडळ, भजनी मंडळ, नशिराबाद नगरपालिकाचे पदाधिकारी व अधिकारी तसेच नशिराबाद पोलीस स्टेशनचे एपीआय आसाराम मनोरे व पोलीस अधिकारी व कर्मचारी यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवणार आहेत.

Spread the love