प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – नाशिक येथील गणेश कॉलनी देवदत्त नगर परिसरातील रहिवाशी महेश पुरुषोत्तम पाटील यांच्या पत्नी स्व. निलांबरी उर्फ ममता पाटील यांच्या वर्षश्राध्द निमित्त तर स्व.पुरुषोत्तम भानजी पाटील यांच्या पुण्यस्मरणार्थ दि.६ ते १३ एप्रिल या कालावधीत श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कथावाचक हभप तुळशिदास महाराज नांदेडकर आपल्या सुश्राव्य वाणीतून कथा सांगत आहेत.
या सप्ताहात दररोज सकाळी काकड आरती , विष्णूसहस्रनाम , कथा वाचन , संध्याकाळी श्रीहरी पाठ असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.१३ रोजी सकाळी ९ वाजता हभप तुळशिदास महाराज नांदेडकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.