आता आधारकार्डची गरज नाही! क्युआर कोड स्कॅन केले की सर्व कामं होणार! आले नवे अ‍ॅप, फायदे घ्या जाणून

0
49

आधारकार्ड असे कार्ड ज्यामुळे तुमचे कोणतेही महत्वाचे काम असले की, त्याच्याशिवाय पान हलत नाही पण आता या आधारकार्डची काही गोष्टींसाठी गरज संपल्यातच जमा आहे.

कारण सरकारने एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

आता विमानतळ, हाॅटेल वा कुठेही पडताळणीसाठी आधारकार्डची फोटोकाॅपी दाखवणे गरजेचे नाही. एवढेच नाहीतर तुम्ही जेव्हा सीमकार्ड किंवा बँकेसाठी कागदपत्रे देता त्यावेळीही आधारकार्डची फोटोकाॅपीची गरज पडणार नाही. याचे एक मोठे कारण आले आहे ते नेमके कोणते हे आपण जाणून घेऊया.

सरकारने आणले आधारकार्ड अ‍ॅप

केंद्र सरकारने काल म्हणजेच 8 एप्रिल 2025 रोजी एक आधारकार्ड अ‍ॅप लाँच केले आहे. याद्वारे आधारकार्डचा दुरुपयोग रोखला जाणार असून यासह इतर महत्वपुर्ण उद्देश समोर ठेवून सरकारने आधारकार्ड अ‍ॅप आणले आहे.

काय फायदा होणार

आधारकार्ड अ‍ॅप आणल्यामुळे आता आधारकार्ड सोबत बाळगण्याची किंवा त्याची फोटोकाॅपी जवळ ठेवण्याची गरज राहणार नाही.

आपले आधारकार्ड व्हेरिफिकेशन सहजरित्या होईल. चेहरा पडताळणीची मदत मिळताच आधारकार्ड व्हेरीफिकेशन सहजगत्या होईल. आपले आधार पुर्णपणे सुरक्षित होईल. गोपनियता सुरक्षित राहील. आपल्या आधारकार्डच्या डेटाचा पुर्ण नियंत्रण आपल्याच हातात राहील आणि आवश्यक डेटाच शेअर होईल. खासकरुन आधारकार्डचा सध्या होत असलेल्या गैरवापरावर आळा बसेल.

या अ‍ॅपचे फिचर आहेत खास

केंद्रीय सुचना आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात माहिती दिली. क्युआर कोड कोड आणि फेस आयडी आधारीत पडताळणी युपीआय पेमेंट जसे आपण करतो तसा आधार व्हेरिफिकेशनसाठी क्यूआर कोड स्कॅन होतो. सोबतच चेहरा पडताळणीची सुविधा असून त्यातून व्यक्तीची ओळख पटून जाते.

Spread the love