जळगावात तलाठ्यांच्या अंगावर घातले ट्रॅक्टर, गुन्हा दाखल

0
40

जळगाव – (JSN) भडगाव शहरातील गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू उत्खनन करून ते ट्रॅक्टरमध्ये भरून अमरडे रस्त्यावर जात असताना पथकातील तलाठ्यांना दिसले. यावेळी सोनालिका कंपनीचे निळे ट्रॅक्टर थांबवले असता ते आमडदे रस्त्यावरून तलाठी यांच्यासमोर पळून गेले.

म्हणून पाचोरा येथील एका वाळू माफिया विरुद्ध भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. भरत भाऊलाल पाटील (५३, व्यवसाय – अधिकारी कोळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक १०/४/२०२५ रोजी रात्री ०२ वाजेच्या चे सुमारास प्रमोदसिंग पाटील ग्राम महसुल अधिकारी, योगेश पाटील ग्राम महसुल अधिकारी, निखील बावस्कर ग्राम महसुल अधिकारी सर्व नेमणुक तहसिल कार्यालय भडगाव असे तहसील कार्यालय भडगाव येथुन अवैध वाळु वाहतुक कारवाईसाठी आमच्या मोटार सायकलने रवाना झालो आणि भडगाव अमडदे रस्तावर थांबलो. एक निळ्या रंगाचे ट्रॅक्टर गिरणा नदीपात्रातुन वाळु उत्खनन करून भडगाव अमडदे रस्तावरुन जाताना दिसले. म्हणून लागलीच आम्ही त्याचा पाठलाग केला असता ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर अंगावर घालण्याचा प्रयत्न केला व थोड्या अंतरावर ट्रॅक्टर थांबवले असता ट्रॅक्टरमध्ये अंदाजे एक ब्रास वाळु होती. त्यानंतर प्रमोदसिंग देवसिंग पाटील ग्रा.म. अधिकारी यांनी चेसीस नंबर व इंजिन नंबरचा फोटो काढला असुन सदर ट्रॅक्टरचा इंजिन नंबर 3105ELU83H755448F20 व चेसीस क्रमांक JZVS676368 (अपूर्ण) असा असलेले ट्रॅक्टर चालक व मालकाचे नाव जिभु वना कोळी रा. पुनगाव ता. पाचोरा जि. जळगाव असे आम्हाला सांगितले. सदर मालाकाने आम्हाला वरील चालक व मालक ट्रॅक्टर घेउन आमडदे गावाकडे पळून गेला. वरील ट्रॅक्टर मधील मुद्देमालाचे वर्णन खालीलप्रमाणे -१) सात लाख रुपये रूपये किमतीचे एक निळ्या रंगाच्या ट्रॅक्टरचा इंजिन नंबर 3105ELU83H755448F20 व चेसीस क्रमांक JZVS676368 (अपूर्ण) असलेला जु.वा.कि.अ. 2) तिन हजार- रूपये कि.चे एक ब्रास वाळू कि.अ.असा एकूण सात लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ट्रॅक्टर मालक जिभु बना कोळी रा. पुनगाव ता. पाचोरा जि. जळगाव याच्या विरुध्द अवैध गौणखनिज सात लाख तीन हजार रुपये कि.चे एक ब्रास वाळू कि.अ गिरणा नदी पात्रातुन उत्खनन करून चोरुन नेले आहे. म्हणून भडगाव पोलीस स्टेशनला आरोपी जीवना कोळी राहणार पुनगाव तालुका पाचोरा याच्या विरुद्ध भडगाव पोलीस स्टेशनला गु.र.न. १२९/२०२५ भारतीय न्याय संहिता (बी एन एस), २०२३ कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास भडगाव पोलीस करीत आहे.

Spread the love