सुनसगावात आग्यामोहोळाच्या मधमाशांचा तिघांवर हल्ला.

0
29

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील सहकार नगरातील एकाच कुटुंबातील सासू व नातीवर आग्या मोहोळाच्या मधमाशांनी हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली.

येथील सहकार नगरातील स्वस्त धान्य दुकाना जवळ असलेल्या कडूनिंबाच्या झाडावर काही दिवसांपासून आग्या मोहळाचे भलेमोठे पोळ आहे . या ठिकाणी ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात वरदळ सुरू असते . याच ठिकाणी शेजारी असलेल्या शोभाबाई भास्कर पाटील व यांच्याच घरातील लहान मुलगी लावण्या माधव पाटील यांच्यावर दि.११ रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास या मधमाशांनी हल्ला केला यात शोभाबाई व नात लावण्या तसेच शुभम शिरसाळे हा घराच्या गच्चीवर असताना जखमी झाले जखमींना घरच्या व शेजारच्या लोकांनी नशिराबाद येथे दवाखाण्यात उपचारासाठी दाखल केले आता उपचार करून या तिघांना घरी आणले आहे. या आग्या मोहळाचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना सांगीतल्याचे सहकार नगरातील ग्रामस्थांनी सांगितले आहे परंतू कोणीही लक्ष देत नसल्याने आणखी कोणी जखमी झाले तर काय करावे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Spread the love