उन्हाळा सुरू झाला आहे, जमीन प्रचंड तापत आहे, त्यामुळे बिळात लपलेले विषारी जीव-जंतू आता बिळातून बाहेर पडत आहेत. यामध्ये सर्वात जास्त धोका हा सापांचा असतो. उन्हाळ्यामध्ये साप थंड जागेचा आसारा घेतात.
उन्हाळा सुरू झाला आहे, जमीन प्रचंड तापत आहे, त्यामुळे बिळात लपलेले विषारी जीव-जंतू आता बिळातून बाहेर पडत आहेत. यामध्ये सर्वात जास्त धोका हा सापांचा असतो. उन्हाळ्यामध्ये साप थंड जागेचा आसारा घेतात.
त्यामुळे अनेकदा साप थंड जागेच्या शोधात घरांमध्ये शिरतता. घरातील अंधाऱ्या जागी किंवा अडोशाला लपून बसतात. त्यामुळे या काळात सर्पदंशाच्या घटना देखील वाढतात. सापा घरात येऊ नयेत म्हणून आपण काही उपाय नक्कीच करू शकतो.
भारतामध्ये सापांच्या हाजारो जाती आढळतात, मात्र त्यातील हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच विषारी जाती आहेत. यामध्ये मण्यार, फुरसे, घोणस, आणि ज्याला आपण कोब्रा म्हणतो तो नाग या चार जातींचा समावेश होतो.
मात्र जर अशाप्रकारे तुमच्या घरात साप निघाला तर त्याला बिनविषारी समजून पकडण्याची चूक चुकूनही करू नका, ते तुमच्या जीवावर बेतू शकतं, त्यामुळे तुम्ही त्याची माहिती सर्प मित्रांना द्या.
आता प्रश्न असा आहे की, सापांपासून आपला बचाव कसा करायचा? अशा काही वनस्पती आहेत, ज्या वनस्पतींच्या वासामुळे साप त्या परिसरात देखील फिरकत नाही, आज आपण अशाच एका वनस्पतीची माहिती घेणार आहोत.
मारुआडोना नावाची ही वनस्पती आहे, काही ग्रामीण भागांमध्ये या वनस्पतीला रान तुळस असं देखील म्हणतात. या वनस्पतीला तीव्र असा वास असतो, या वासामुळे साप घरात येत नाहीत.
ग्रामीण भागातील लोक या वनस्पतीच्या फांद्या तोडून आपल्या घरात आणि जनावरांच्या गोठ्यात ठेवतात, या वनस्पतीच्या वासामुळे साप आसपास देखील येत नाही, असं बोललं जातं. काही लोक या वनस्पतीची पान वाळवून आपल्या घरात ठेवतात, वर्षभर या पानांमधून मंद वास येत राहतो. या वासामुळे साप घरात येत नाही. ( वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल जळगाव संदेश न्युज कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)