यावल – : तालुक्याती चुंचाळे येथील ग्रामपंचायतीचा अजब कारभार चव्हाट्यावर आला आहे. बऱ्याच माहिन्या पासुन कोणतीही ग्रामसभा न घेता बनावट प्रोसीडींग तयार करून घोटाळा केल्याबाबतच्या बऱ्याच तक्रारी यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचेकडे केले असतांना देखील संबंधीत दोषींनवर आजतागायत कोणत्याच प्रकारची कारवाई केली नसल्याने यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांची देखील तात्काळ बदली करण्याची मागणी उपोषणकर्त्यांकडून करण्यात आलेली आहे.
याबाबत सविस्तर वृत असे कि यावल तालुक्यातील चुंचाळे ग्रामपंचायतीमध्ये मागील दोन वर्षांपासून कोणतीही ग्रामसभा घेण्यात आलेली नाही. ग्रामसभा न घेणे हे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या तरतुदींच्या विरोधात असून ग्रामस्थांच्या हक्कांचा उल्लंघन आहे.
त्याचप्रमाणे घरकुल योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार व अपात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात आलेला आहे. तसेच एकाच जागेवर अनेक घरकुल मंजूर करण्यात आले असुन त्याचे धनादेश देखील काढून घेण्यात आले आहे.
प्रत्यक्षात मंजूर झालेल्या व धनादेश प्राप्त झालेल्या जागेवर घरकुल बांधण्यात आलेले नाहीत. किंवा घरकुल प्राप्त झाल्याचे व ते पूर्ण झाले असे दाखवून सुद्धा तसा कुठलाच उल्लेख उताऱ्यावर करण्यात आलेला नाही. चुंचाळे ग्रामपंचायतीने गेल्या पाच वर्षांत मंजूर केलेले गोठे व प्रत्यक्षात जागेवर कोणी व किती गोठे बांधले त्याची सुद्धा चौकशी व्हावी. रोजगार हमी योजनेच्या कामात देखिल मोठा अपहार झाल्याची तक्रार ग्रामस्थानकडुन करण्यात आलेली आहे. रोजगार हमी योजनेच्या याद्यानमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात घोळ आहे. त्यामधे किती लोक आहेत व प्रत्यक्षात जागेवर किती कामगार होते तेथेही मोठा भ्रष्टाचार उघडकीस येण्याची शक्यता असल्याने या प्रकरणाची देखील आजपावेतो साधीचौकशी देखील करण्यात आलेली नाही. गावी ग्रामपंचायतीने मंजूर केलेल्या मराठी शाळेच्या संरक्षण भिंतीचे कामासाठी 1700000 रुपये खर्च दाखवण्यात आला आहे. मात्र मराठी शाळेला स्वरक्षण भिंत बांधण्यात आलेली नाही. याप्रकरणाची देखील चौकशी आपले स्तरावरून करण्यात यावी. यासंदर्भात उपोषणकर्त्या प्राजक्ता संजय तायडे व सुजाता ठाकूर जोशी यानी दि 29/04/2025 रोजी पासुन जिल्हापरिषद जळगांव येथे आमरण उपोषणाला बसणार असल्याबाबत जिल्हा परिषद जळगाव येथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांना एका लेखी निवेदनाद्वारे कळविलेले असताना देखील वरिष्ठांकडून सदर तक्रारीबाबत कोणत्याच प्रकारची चौकशी किंवा कारवाई न झाल्यामुळे उपोषणकर्त्या जि प समोर संबंधितावर फौजदारी स्वरूपाची कारवाई होईपर्यंतया अमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सदर विषयाबाबत ग्रामस्थांकडून अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या असूनही कोणतीही चौकशी अथवा कारवाई करण्यात आलेली नाही.
या प्रकारात सरपंच, उपसरपंच व कार्यालयीन कर्मचारी यांची थेट भूमिका असून, ते दोषी आढळल्यास त्यांना तत्काळ पदावरून अपात्र ठरवावे व त्यांचेवर कायदेशीर कारवाई करावी.
त्याचप्रमाणे यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हे देखील या सर्व प्रकरणात जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने त्यांची देखील तात्काळ बदली करण्यात यावी.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी ही बोदवड किंवा मुक्ताईनगर येथील गटविकास अधिकारी यांच्या माध्यमातून चौकशी करुण मिळावी जेणेकरून चौकशी पारदर्शक व निष्पक्ष होईल.
जि प प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन दोषींनवर त्वरीत कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी उपोषण कर्त्या प्राजक्ता तायडे, सुजाता ठाकुर (जोशी) यांनी केली आहे.