सुनसगाव येथे २ मे रोजी श्री खंडेराव महाराज यात्रा.

0
48

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथे सालाबादा प्रमाणे श्री खंडेराव महाराज यात्रा निमित्त बारागाड्यांचे आयोजन करण्यात आले असून भगत श्रीकृष्ण उर्फ प्रभाकर भोजू कंखरे हे बारागाड्या ओढणार आहेत.

त्यांना गावातील वसंत भगत ,संतोष भगत ,वामन भगत , अशोक चिंचोरे , पुंडलिक कंखरे , योगेश पाटील , पंढरी कंखरे व गावातील सर्व पदाधिकारी सहकार्य करीत आहेत. यात्रेत मिठाई ,खेळणी ,पाळणे असे अनेक दुकाने थाटली जातात तसेच रात्री लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेत कोणीही गोंधळ घालू नये यासाठी भुसावळ तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस अधिकारी व कुऱ्हा पानाचे औट पोष्ट चे पोलीस कर्मचारी चोख बंदोबस्त तैनात ठेवणार आहेत.

बारा महिन्यातून यात्रेचा एक दिवस येतो या दिवसाचा आनंद घ्यावा तसेच कोणीही यात्रेत गोंधळ घालू नये अन्यथा पोलीस कारवाई करण्यात येईल असे पोलीस पाटील खुशाल पाटील व पत्रकार जितेंद्र काटे सर यांनी सांगीतले आहे.

Spread the love