प्रतिनिधी- जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील वराडसिम परिसरात रात्री अपरात्री अवजड वाहने रस्त्यावरुन जात असल्याने वाहनांमुळे नविन रस्त्याची वाट लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या परिसरात राख , डबर ,मुरुम ,रेती यांची सर्रासपणे वाहतूक केली जाते आहे ही गौणखनीजे वाहून नेण्यासाठी डंपर चा वापर केला जातो .प्रमाणाच्या बाहेर माल भरण्यात येतो त्यामुळे नविन तयार केलेले रस्ते खराब होत आहेत तर या अवजड वाहनांमुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे.
वराडसिम येथील सामाजिक कार्यकर्ते कैलास कोल्हे व सुनसगाव येथील लिलाधर पाटील यांनी ‘ आपली माणसं ‘ या व्हाटस् अप गृप वर ही माहिती शेअर केली आहे.तसेच या अवैध व्यावसायकांना कोणाचा आशिर्वाद आहे याची माहिती मिळावी असे कैलास कोल्हे यांनी सांगीतले असून वराडसिम गावात हा मेसेज व्हायरल झाला आहे. या माहितीला वराडसिम प्रभारी सरपंच प्रकाश ठाकूर यांनी दुजोरा दिला आहे.