याचं नशीब लिहीलयं तरी कुणी ? आधी 6 करोडची लॉटरी लागली, त्या पैशातून जमीन घेतली त्यात खजिना सापडला

0
30

अनेक गोष्टी या नशिबावर अवलंबून असतात आसे अनेक जण मानतात. लहानपणीच सटवाई आपलं नशिब लिहीते असे देखील मानले जाते. एखादा जॅकपॉट किंवा लॉटरी लागली तसेच आयुष्यात काही तरी अनेपक्षित घड़तं..

हा सर्व नशिबाचाच एक भाग आहे असंही बोलले जाते. मात्र, केरळमधील एका व्यक्तीच्या आयुष्यात इतक्या अनेपिक्षत घटना घडल्या आहेत. याच्या आयुष्यात जे काही घडलं आहे ते पाहून याचं नशीब लिहीलयं तरी कुणी? असा प्रश्न पडतो.

केरळमधील बी. रत्नाकर पिल्लई यांच्या आयुष्यात जे काही घडलं ते पाहून देवाचाही विश्वास बसणार नाही असं म्हंटल्यास आश्चर्य वाटणार नाही. बी रत्नाकर पिल्लई यांनी नशिब आजमवयचं म्हणून लॉटरी काढली आणि ते लॉटरीत तब्बल 6 कोटी रुपये जिंकले. 6 कोटींची लॉटरी जिंकल्यानंतर पिल्लई यांना मोटा जॅकपॉटचं लागला.

पिल्लई यांनी लॉटरीचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवण्याचा निर्णय घेतला. गुंतवणूक म्हणून त्यांनी लॉटरीच्या पैशांतून शेत जमीन घेतली. या जमीनीत शेतीसाठी खोदकाम करत असताना त्यांंच्या हाती खजिना लागला. शेतीसाठी नांगरणी करताना त्याला एक हंडा सापडला. हा हंडा 100 वर्षे जुना होता आणि त्यात नाणी भरलेली होती. त्यात एकूण 2595 प्राचीन नाणी होती, ज्यांचे वजन 20 किलोग्रॅमपेक्षा जास्त होते. ही नाणी तांब्याची आहेत. त्रावणकोर साम्राज्यातील ही नाणी असल्याचे सांगितले जाते. ही नाणी प्राचीन असल्याने यांना ऐतिहासिक महत्त्व देखील आहे.

त्रावणकोरच्या दोन महाराजांच्या कारकिर्दीत ही नाणी चलनात होती असे म्हटले जाते. त्यापैकी पहिले मूलम थिरुनल रामा वर्मा होते. त्यांचे राज्य 1885 ते 1924 पर्यंत चालले आणि दुसरे राजा चित्रा थिरुनल बाला राम वर्मा होते. ते त्रावणकोरचे शेवटचे शासक होते आणि त्यांनी 1924 ते 1949 पर्यंत राज्य केले. बी रत्नाकर पिल्लई यांच्या सोबत घडलेली ही घटना 2019 सालची आहे. मात्र, भाग्यवान लोकांच्या नावांची किस्स्यांची चर्चा रंगले तेव्हा बी रत्नाकर पिल्लई यांचे नाव नेहमी चर्चेत येते.

Spread the love