पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) नेते आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची जेलमध्ये मृत्यू झाल्याची बातमी शनिवारी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
एकीकडे भारत पाकिस्तान यांच्यातील तणावाची स्थिती असताना आणि सीजफायवर दोन्ही देशांकडून झालेल्या चर्चेनंतर झालेल्या निर्णयाच्या गडबडीतच इम्रान खान यांच्या मृत्यूची बातमी समोर आली. परंतु पाकिस्तानी मीडियाने सोशल मीडियावरील सर्व दावे फेटाळून लावले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पत्रकानुसार, इम्रान खान यांची शनिवारी मृत्यूच्या बातमीने सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. तथापि, पाकिस्तानी माध्यमांनी इम्रान खानच्या हत्येची बातमी खोटी असल्याचा दावा केला आहे. सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल ट्रोलर्सनाही दोषी ठरवले आहे. पाकिस्तानी माध्यमांनी दावा केला आहे की इम्रान खान तुरुंगात “सुरक्षित आणि निरोगी” आहेत.
व्हायरल पत्रकात काय करण्यात आला दावा!
शनिवारी, सोशल मीडियावर एक बातमी पसरली ज्यामध्ये दावा करण्यात आला होता की, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची त्यांच्या गुप्तचर संस्थेच्या आयएसआयने तुरुंगात हत्या केली आहे. तुरुंगात विष देऊन इम्रान खानची हत्या करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. तथापि, पाकिस्तानी माध्यमांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. ते खोटे असल्याचा दावा केला आहे. परंतु या बनावट बातमीच्या संदर्भात पाकिस्तान किंवा तुरुंग अधिकाऱ्यांकडून कोणतीही अधिकृत पुष्टी किंवा विधान जारी केलेले नाही.