पाककडून ‘गोळी’ चालवल्यास, आमच्याकडून ‘गोळा’ चालेल; PM मोदींचा PAK ला थेट इशारा

0
35

दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेले नाही, असे म्हटले आहे. ‘पाकिस्तानने जर पुन्हा गोळीबार केला तर आम्ही देखील गोळीबार करू आणि जर त्यांनी हल्ला केला तर आम्ही देखील त्यांला चोख प्रत्युत्तर देऊ”, असे स्पष्टच सांगितल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

आज (दि.११) झालेल्या तिन्ही दलाच्या बैठकीदरम्यान पीएम मोदींना पाकिस्तानला थेट इशाराच दिला आहे, या संदर्भात ANIने एक्स पोस्ट केली आहे.

PAK मधील हवाई तळांवरील हल्ले ऑपरेशन सिंदूरचा महत्त्वाचा टप्पा

‘तिथून गोळ्या झाडल्यास, येथून गोळे झाडले जातील’, असा इशारा PM मोदींनी पाकिस्तानला दिला आहे की. तसेच ऑपरेशन सिंदूरमधील पाकिस्तानमधील हवाई तळांवरील हल्ले हा महत्त्वाचा टप्पा असल्याचेही पीएम मोदी म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

Spread the love