ललिता लोखंडे यांना जिल्हा विकास समन्वय समिताचा “दिशा पुरस्कार”

0
22

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कठोरा अंतर्गत फेकरी उपकेंद्रा मध्ये कार्यरत आरोग्य सेविका ललिता मुरलीधर लोखंडे यांना जिल्हा विकास समन्वय समितीचा जिल्हास्तरीय “दिशा पुरस्कार” नुकताच प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार आमदार राजुमामा भोळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी पाणीपुरवठा मंत्री आणि पालक मंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय युवा व क्रीडा राज्य मंत्री रक्षा खडसे, खासदार स्मिता वाघ, आमदार राजुमामा भोळे, जिल्हा अधिकारी आयुष्य प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य अधिकारी मीनल करणवाल आणि डॉ. सचिन भोयकर यांच्या सह इतर मान्यवर व्यक्तींची उपस्थिती होती.

ललिता लोखंडे यांच्या कार्याची दखल घेतलेली ही सन्मानाची घटना झाली असून, त्यांच्या कर्तुत्वामुळे फेकरी गावातील आरोग्य सुविधांमध्ये महत्वपूर्ण सुधारणा झाली आहे. या पुरस्कारामुळे ललिता लोखंडे यांचे फेकरी गावचे सरपंच चेतना भिरुड, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

या सन्मानामुळे, लोखंडे यांच्या सामाजिक कार्याची आणि मेहनतीची महत्त्वता अधिक उजागर झाली आहे. त्यांनी स्थानिक आरोग्य सेवेच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दलवैद्यकीय अधिकारी डॉक्टर संगीता पांढरे ,डॉक्टर कल्पना दवंगे व सर्व आरोग्य कर्मचारी यांचे अनमोल सरकार्य व मार्गदर्शन लाभले

या पुरस्कारामुळे ललिता लोखंडे यांना अधिक प्रेरणा मिळणार आहे, अशी अपेक्षा उपस्थित मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आली.

ललिता लोखंडे यांचा हा पुरस्कार केवळ त्यांच्या कार्याचा सन्मान नाही तर इतर सर्व आरोग्य सेवकांसाठी एक प्रेरणादायक उदाहरण आहे. त्यांच्या मेहनतीमुळे आरोग्यसेवा क्षेत्रातील अन् आरोग्याच्या भल्यासंबंधीच्या उपक्रमांना गती येईल, अशी आशा आहे.

Spread the love