प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव व परिसरात नुकत्याच झालेल्या चक्री वादळामुळे श्री शक्ती पेपरमील चे पत्रे उडून पावसाचे पाणी आत शिरल्याने तयार मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे
या बाबत सविस्तर माहिती अशी की , गेल्या तीन चार दिवसा पासून दररोज सुनसगाव परिसरात वादळी वारा सुटतो आहे या वादळामुळे दररोज काहीना काही नुकसान होत आहे.
नुकत्याच दोन दिवसा पुर्वी अशाच प्रकारे वादळ या परिसरात आले. सुनसगाव – गोजोरा रस्त्यावर गट नंबर १२० मध्ये असलेल्या श्री शक्ती पेपरमील चा आजूबाजूचा परिसर हा शेती शिवाराचा असल्याने या ठिकाणी वाऱ्याची वावटळ निर्माण झाली असता पेपरमील ची पत्रांची आडोसा भिंत ही आडवी आल्याने पेपरमील वरील अनेक पत्रे उडून गेली त्यामुळे पेपरमील मध्ये फिनीशींग करुन तयार असलेला लाखो रुपयांचा माल पाण्यात भिजून वाया गेला. तसेच इलेक्ट्रीक बोर्ड चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मोटारी जळाल्या आहेत. या ठिकाणी सुनसगाव तलाठी सुनीता वळवी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करून नियमानुसार पंचनामा केला आहे. नुकसान ग्रस्त कंपनी मालकांनी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शासनाकडे केली आहे.