तुरखेडा- वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रवादी विचारधारेने व धर्मवीर आनंदी दिघे साहेब यांच्या कार्यसंस्कृतीने प्रेरित होत तुरखेडा गावातील नागरिकांनी शिवसेना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासाठी भरभरून सहभाग नोंदवला आहे.
गावात नुकतीच घेण्यात आलेली सदस्य नोंदणी मोहीम उत्साहात पार पडली. यावेळी युवक-युवतींपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच स्तरातील लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत सदस्यत्व स्वीकारले.
या मोहिमेत शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गावातील अनेक नागरिकांनी पक्षाची प्राथमिक सदस्यत्व घेतले. धर्मवीर आनंदी दिघे साहेबांनी दिलेल्या सेवाभावी व निःस्वार्थ कार्याच्या शिकवणीचा प्रभाव आजही गावकऱ्यांच्या मनामनात आहे, हे यावेळी स्पष्टपणे जाणवले.
शिवसेना पक्षाचे विचार गावपातळीवर पोहोचवण्याचे कार्य यानिमित्ताने अधिक बळकट झाले असून, लवकरच गावात विविध सामाजिक उपक्रम व विकासकामांसाठी शिवसेनेच्या माध्यमातून विशेष पुढाकार घेतला जाणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले