प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण अंतर्गत घरकुल सर्व्हेसाठी मुदतवाढ

0
38

जळगाव (प्रतिनिधी) दि.१९ मे २५ :- प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी सर्व्हे प्रक्रिया सुरु असून, या सर्व्हेची अंतिम मुदत १५ मे २०२५ होती. मात्र, शासनाकडून या सर्व्हेसाठीची मुदत वाढविण्यात आली असून आता ३१ मे २०२५ ही अंतिम मुदत राहणार आहे.

हा सर्व्हे लाभार्थ्यांनी स्वतः ऑनलाईन किंवा ग्रामसेवकांच्या माध्यमातून पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी गावपातळीवर सरपंचांनी पुढाकार घेऊन अधिकाधिक ग्रामस्थांना या सर्व्हेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांनी केले आहे.

या सर्व्हेमुळे पात्र लाभार्थ्यांची अचूक माहिती मिळून गरजू लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळवून देता येणार आहे. त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी या संधीचा लाभ घ्यावा व वेळेत सर्व्हे पूर्ण करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

Spread the love