सिंधु नदीच्या पाण्याचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. भारताने पाणी रोखल्याने सिंधमध्ये गृहयुद्ध सदृश्य परिस्थिती आहे. असंतोष इतका भडकला आहे की, आंदोलकांनी सिंधच्या गृहमंत्र्याचं घरच पेटवून दिले आहे. यात एक ते दोघांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.
भारताने पहलगाम हल्ल्यानंतर सिंधु नदीचे पाणी अडवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे पडसाद आता पाकिस्तानमध्ये दिसत आहे. येथील पाण्याचा प्रश्न भीषण झाला आहे. सिंधु नदीच्या पाण्याचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. भारताने पाणी रोखल्याने सिंधमध्ये गृहयुद्ध सदृश्य परिस्थिती आहे. असंतोष इतका भडकला आहे की, आंदोलकांनी सिंधच्या गृहमंत्र्याचं घरच पेटवून दिले आहे. पाकमधील आंदोलक सरकारच्या नियंत्रणाबाहेर गेल्याचे दिसत आहे. या आंदोलनात एक ते दोघांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.
पाकड्यांची चोहो बाजूने कोंडी सुरू आहे. एकीकडे सिंधु नदीचे पाणी भारताने अडवले आहे. तर दुसरीकडे सरकारच्या सहा कालवे प्रकल्पाला सिंध प्रांतातील लोकांचा प्रचंड विरोध सुरू आहे. मंगळवारी या आंदोलनाला हिंसक वळण लागले. पाकिस्तानातील सिंध प्रांताचे गृहमंत्री जियाउल हसन लंजर यांचे नौशहरो जिल्ह्यातील घर आंदोलकांनी जाळले. त्यांच्या घराची मोठी नासधूस करण्यात आली. आंदोलकांच्या हाती यावेळी बंदुका होत्या. या बंदुकातून अनेकांनी हवेत गोळीबार केला. गृहमंत्र्याच्या घरातील काही लोकांना मारहाण करण्यात आली. आंदोलकांनी यावेळी शेकडो वाहनं पेटवून दिली.
राष्ट्रीय महामार्गावर मोरो शहरात गृहमंत्र्याचे घर आहे. याठिकाणी आंदोलन करण्यात येत होते. त्यावेळी पोलीस आणि आंदोलकात अगोदर बाचाबाची झाली. पुढे पोलीस आणि आंदोलकांमध्ये झडप झाली. मग आंदोलकांनी पोलिसांसह गृहमंत्र्याच्या घरावर हल्ला चढवला. पोलिसांची वाहनं पेटवून देण्यात आली आहे. या आंदोलनात, दोन आंदोलकाचा मृत्यू झाल्यानंतर जमाव हिंसक झाला. संतप्त जमावाने पोलिसांची वाहनं जाळली. त्यात एक डीएसपी आणि इतर अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
चोलिस्तान कालव्याचा मुद्दा पाकिस्तान पिपल्स पार्टीच्या नेतृत्वातील सिंध सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात वादाचा मुद्दा आहे. शाहबाज शरीफ सरकार चोलिस्तानमधील वाळवंटात सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयोग राबवण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी सिंधु नदीवर सहा कालव्याची निर्मिती करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. पण पीपीपी आणि सिंध प्रांतातील राजकीय दल त्याला कडाडून विरोध करत आहेत. त्यातच भारताने सिंधुचे पाणी अडवल्याने सिंधमध्येच पाण्याचा तुटवडा जाणवण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे या प्रकरणी आंदोलक संतप्त झाले आहेत.
सरकारी आकडेवारीनुसार, चोलिस्तान कालवा प्रकल्पासाठी अंदाजे 211.4 अब्ज रुपयांचा खर्च येईल. त्यामाध्यमातून हजारो एकर नापीक जमीन शेतीयोग्य होईल. त्यातून मोठे उत्पन्न घेता येईल. 400,000 एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. पण सिंध लोकांसाठी ही पण एक डोकेदुखी ठरणार आहे. पाणी तर हातचे जाईलच. पण सर्वाधिक उत्पन्न घेणारा प्रांत म्हणून असलेली ओळख धोक्यात येण्याची भीती पण आहे.