भरधाव रेतीच्या डंपरने झाडाखाली बसलेल्या दोघांना चिरडले; संतप्त जमावाने डंपर पेटवला

0
27

बुलढाणा : वाळू वाहतूक करणारे डंपर व ट्रॅक्टर सुसाट वेगाने पळविले जातात. यामुळे अनेक अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात आज सकाळी भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने झाडाखाली बसलेल्या दोघांना चिरडल्याची घटना घडली आहे.

या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अवैध्य गौण खनिज आणि वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरमुळे होणारे अपघात जळगाव जामोद् तालुक्यात थांबता थांबत नसल्याचे दिसून येत आहे. पंधरा दिवस अगोदरच तालुक्यातील माऊली फाट्यावर एका डंपरनेच्या अपघातात दोन चिमुकले व आजींचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. हि घटना ताजी असतानाच पुन्हा जळगाव जामोद तालुक्यातील दादुलगाव येथे एका डंपरने दोन इसमांना चिरडल्याची घटना घडली आहे.

दोघेही गंभीर जखमी

बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील मानेगाव कडून येणाऱ्या टिप्परवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने दादुलगाव बसस्थानक परिसरात झाडाखाली बसलेल्या दोन इसमांना चिरडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. अपघातात दादुलगाव येथील काशिनाथ झाल्टे (वय ४०) व समाधान काळे (वय ५५) हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खामगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Spread the love